आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिंधू 63 मिनिटांत उपांत्य फेरीत; समीर वर्माचे अाव्हान संपुष्टात; पुरुष एकेरीत समीरचा पराभव

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सेऊल- रिअाे अाॅलिम्पिक अाणि वर्ल्ड चॅम्पियनशिपमधील राैप्यपदक विजेत्या पी.व्ही. सिंधूने शानदार विजयाच्या बळावर काेरिया सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली. तिने ६३ मिनिटांमध्ये महिला एकेरीचा उपांत्यपूर्व सामना जिंकला. दुसरीकडे भारताच्या युवा खेळाडू समीर वर्मा अाणि स्वस्तिकराज-चिराग शेट्टीचे स्पर्धेतील अाव्हान संपुष्टात अाले. त्यामुळे अाता भारतीय संघाची पदकासाठीची मदार सिंधूवर असेल. यासाठी तिच्याकडून साेनेरी यशाची अाशा अाहे. पदकापासून ती दाेन पावलांवर अाहे. यासाठी तिच्यावर स्पर्धेत खास नजर असेल.   

स्वस्तिक-चिराग पराभूत 
पुरुष दुहेरीमध्ये भारताची स्वस्तिकराज-चिराग शेट्टी ही जाेडी सपशेल अपयशी ठरली. त्यांना उपांत्यपूर्व सामन्यात पराभवाला सामाेरे जावे लागले. तिसऱ्या मानांकित ताकेशी कामुरा अाणि साेनाेडा काईगाेने रंगतदार लढतीमध्ये भारताच्या स्वस्तिकराज-चिरागवर मात केली. त्यांनी २१-१४,१७-२१, २१-१५ अशा फरकाने सामना जिंकला. यासह त्यांनी पुरुष दुहेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. दुसरीकडे पराभवामुळे भारताच्या बिगरमानांकित जाेडीला स्पर्धेतून बाहेर पडावे लागले. यातून त्यांचे स्वप्न भंगले.   
 
सिंधूची मितानीवर मात 
पाचव्या मानांकित सिंधूने महिला एकेरीच्या अंतिम अाठमध्ये राेमहर्षक विजयाची नाेंद केली. तिने लढतीमध्ये जपानच्या मितानी मिनात्सूवर मात केली. तिने २१-१९, १६-२१, २१-१० अशा फरकाने विजयश्री खेचून अाणली. यासाठी तिने एक तास ३ मिनिटे शर्थीची झंुज दिली. यासह तिने उपांंत्य फेरीतील अापला प्रवेश निश्चित केला. अाता हीच विजयी लय अागामी सामन्यातही कायम ठेवण्याचा तिचा मानस अाहे. जागतिक स्पर्धेतील पदकापाठाेपाठ अाता काेरियात साेनेरी यश संपादन करण्यासाठी ती उत्सुक अाहे. त्यासाठी तिने कंबर कसली अाहे. अाता तिचा उपांत्य सामना सहाव्या मानांकित बिगिजाेशी हाेईल.
 
अाघाडी घेऊनही समीर अपयशी
भारताच्या बिगरमानांकित समीर वर्माने विजयासाठी दिलेली झुंज अपयशी ठरली. त्याने पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व सामन्यात अव्वल मानांकित वान हाे साेनविरुद्ध १ तास ९ मिनिटे झुंज दिली. मात्र, त्याचा विजयाचा प्रयत्न अपुरा ठरला. अव्वल मानांकित वान साेनने २०-२२, २१-१०, २१-१३ अशा फरकाने राेमहर्षक विजयाची नाेंद केली. यासह त्याने अंतिम चारमधील अापला प्रवेश निश्चित केला. समीरला अाघाडी घेऊनही पराभवाचा सामना करावा लागला. त्याने दाेन गुणांच्या अाघाडीने पहिला गेम जिंकला. यासह त्याने लढतीमध्ये अाघाडी मिळवली हाेती. मात्र, त्यानंतर ताे दाेन्ही गेममध्ये अपयशी ठरला. यातून त्याला सामना गमवावा लागला.   
 
बातम्या आणखी आहेत...