आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिंधू, के. श्रीकांतची दुसऱ्या फेरीत धडक : डेन्मार्कच्या लिनेचा पराभव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जकार्ता- दाेन वेळची कांस्यपदक विजेती पी.व्ही. सिंधू अाणि के. श्रीकांतने मंगळवारी जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये दमदार सुरुवात केली. भारताच्या या दाेन्ही खेळाडूंनी अापापल्या गटातील सलामीचे सामने जिंकून दुसऱ्या फेरीत धडक मारली. जागतिक क्रमवारीत १३ व्या स्थानावर असलेल्या सिंधूने अातापर्यंत सलग दाेन वेळा जागतिक स्पर्धेत कांस्यपदकावर नाव काेरले. अाता तिच्याकडून सुवर्णपदकाची अाशा केली जात अाहे.
सिंधूचा राेमहर्षक विजय
महिला गटात ११ व्या मानांकित सिंधूने एकेरीच्या सलामीला डेन्मार्कच्या लिने जार्सफेल्टचा पराभव केला. तिने रंगतदार लढतीत ११-२१, २१-१७, २१-१६ अशा फरकाने राेमहर्षक विजयाची नाेंद केली. यासाठी तिने ५२ मिनिटे शर्थीची झुंज दिली. पहिला गेम गमावल्यानंतर तिने दमदार पुनरागमन करताना सामना अापल्या नावे केला. त्यामुळे तिला एकेरीच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश निश्चित करता अाला. पराभवासह जागतिक क्रमवारीत ५३ व्या स्थानावर असलेल्या लिनेचे स्पर्धेतील अाव्हान संपुष्टात अाले. तिने दिलेली झुंज अपयशी ठरली.

श्रीकांत २४ मिनिटांत विजयी
इंडिया अाेपन चॅम्पियनमध्ये के.श्रीकांतने अवघ्या २४ मिनिटांत विजयी सलामी दिली. त्याने पुरुष एकेरीच्या सलामी सामन्यात बिगरमानांकित मिचेल फरिमनचा पराभव केला. तिसऱ्या मानांकित श्रीकांतने २१-१०, २१-१३ अशा फरकाने सामना जिंकला. या वेगवान विजयासह त्याने दुसऱ्या फेरीत धडक मारली.

मनू-सुमीत स्पर्धेतून बाहेर
भारताची मनू अत्री अाणि सुमीत रेड्डीचे स्पर्धेतील अाव्हान संपुष्टात अाले. या बिगर मानांकित जाेडीला मिश्र दुहेरीच्या सलामी सामन्यात पराभवाला सामाेरे जावे लागले. चीनच्या काई यून-लू काईने भारताच्या मनू-सुमीतला २१-९, २१-७ ने पराभूत केले.