आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Singapor Open Badminton: P.Sandhu Entered In Second Round

पी. सिंधू दुसऱ्या फेरीत; के. श्रीकांतचा पराभव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिंगापूर सिटी - पहिला सेट गमावल्यानंतर भारताच्या पी. व्ही. सिंधूने पुनरागमन करताना थायलंडच्या बुसानन ओंगबुमरुंगफानला पराभूत केले. या विजयासह सिंधूने सिंगापूर ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश मिळवला. भारताचा किदाम्बी श्रीकांत, अजय जयराम आणि एच. एस. प्रणय यांचे स्पर्धेच्या पहिल्या फेरीत आव्हान संपुष्टात आले.

सिंधूने बुसाननला ५४ मिनिटांत ९-२१, २१-१७, २१-११ ने हरवले. दुसऱ्या फेरीत सिंधूचा सामना चीनच्या बिंगजियाओसोबत होईल. सिंधूने मलेशिया ओपनमध्ये बिंगजियाओला हरवले होते. मुख्य ड्रॉच्या पहिल्या फेरीत जागतिक क्रमवारीत २२ व्या क्रमांकावर असलेल्या प्रणवला अव्वल मानांकित चीनच्या चेन लोंगचे आव्हान होते. प्रणवने १ तास ११ मिनिटे संघर्ष केला, मात्र त्याचा २१-१८, १८-२१, १९-२१ ने पराभव झाला. विश्व क्रमवारीत २४ व्या क्रमांकावर असलेल्या जयरामला जर्मनीच्या मार्क ज्वेबलरने ३७ मिनिटांत १७-२१, १६-२१ ने हरवले. पुरुष एकेरीत भारताचे मुख्य आव्हान मानला जाणारा किदाम्बी श्रीकांतचा चीन तैपेईकच्या सू जेन हाओकडून १ तास १७ मिनिटांत २१-११, १८-२१, १८-२१ ने पराभव झाला. मिश्र दुहेरीत प्रणव-एन सिक्की रेड्डी यांनी यश मिळवले. त्यांनी इंडोनेशियाचा इरफान फादहिल्लह आणि वेनी अंगारेनली या जोडीला ३१ मिनिटांत २१-१५, २१-१७ ने पराभूत करून दुसरी फेरी गाठली.