आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Six Aurangabad Players Get Shichhatrapati State Award

मकरंद जोशी, डॉ. उदय डोंगरेंसह औरंगाबादचे सहा जणांना शिवछत्रपती पुरस्कार जाहीर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मकरंद जोशी आणि डॉ. उदय डोंगरे - Divya Marathi
मकरंद जोशी आणि डॉ. उदय डोंगरे
औरंगाबाद - विजयादशमीच्या पूर्वसंध्येला औरंगाबादच्या सहा खेळाडूंनी शिवछत्रपती राज्य पुरस्कारांमध्ये ‘सीमोल्लंघन’ केले. महाराष्ट्र शासनाच्या वतीने बुधवारी क्रीडा क्षेत्रातील अत्यंत प्रतिष्ठेच्या आणि मानाच्या शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारची घोषणा करण्यात आली. गेल्या २०१२-१३ आणि २०१३-१४ या वर्षांतील हे पुरस्कार जाहीर झाले. यामध्ये मकरंद जोशी आणि डॉ. उदय डोंगरे यांना २०१२-१३ चा शिवछत्रपती राज्य क्रीडा मार्गदर्शकाचा पुरस्कार मिळाला. खेळाडूंमध्ये औरंगाबादचे युवा गुणवंत खेळाडू सर्वेश भाले, वंदिता जोशी, विवेक देशपांडे (जिम्नॅस्टिक) २०१२-१३ आणि दिनेश वंजारे (तलवारबाजी) २०१३-१४ च्या शिवछत्रपती पुरस्काराचे मानकरी ठरले.

जिगरबाज हुसेन कोरबूला पुरस्कार
सांगलीच्या हुसेन अजीज कोरबूने सायकलिंगमध्ये २०१३-१४ च्या वर्षाचा शिवछत्रपती पुरस्कार पटकावला. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून त्याने सायकलिंगमध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर नाव कमावले. त्याच्या कामगिरीवर दैनिक ‘दिव्य मराठी’ने प्रकाशझोत टाकला होता.

जोशी, डोंगरेंना डबल पुरस्कार
औरंगाबादचे डॉ. मकरंद जोशी (१९९३ खेळाडू) आणि डॉ. उदय डोंगरे (२००८ खेळाडू) यांना २०१२-१३ वर्षांच्या क्रीडा मार्गदर्शक पुरस्कारने गौरवण्यात येणार आहे. यापूर्वी या दोघांनी खेळाडूंचा शिवछत्रपती पुरस्कार मिळवला आहे. आता डबल पुरस्कार पटकावणारे औरंगाबादचे ते पहिले मान्यवर ठरले आहेत. जोशींना थेट पुरस्कार देण्यात आला असून त्यांनी आतापर्यंत १२ शिवछत्रपती पुरस्कार विजेते, २२ आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवले आहेत.

असा होईल गौरव
>जीवनगौरव पुरस्कार
रु.३.०० लाख.
>शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडू/संघटक-कार्यकर्ते)
रु.१.०० लाख
>उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार - रु. १.०० लाख
>जिजामाता पुरस्कार
रु. १.०० लाख
>एकलव्य राज्य क्रीडा पुरस्कार (अपंग खेळाडू)
रु. १.०० लाख
पुढे वाचा.. औरंगाबादचे शिवछत्रपती पुरस्कार विजेते मार्गदर्शक आणि खेळाडू