आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सहावर्षीय गाेल्फपटू; जन्मापासून एक हात नाही, प्राेफेशनल खेळाडूंनाही देताेय तगडे अाव्हान

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाॅम बीच सिटी (फ्लाेरिडा)-  अमेरिकेचा टाॅमी माेरिसे. वय अवघे सहा वर्षे. जन्मत:च उजवा हात नाही. मात्र, तरीही त्यान गाेल्फसारख्या खेळामध्ये विशेष प्रावीण्य मिळवले. ताे बलाढ्य अाणि अनुभवी खेळाडूंनाही तगडे अाव्हान देण्याची किमया साधत अाहे. म्हणूनच त्याला ‘अमेझिंग किड’ नावाने सर्व जण बाेलावतात. 
 
टाॅमीकडून मिळालेल्या पराभवाचे काेणतेही दुख या माेठ्या अाणि अनुभवी खेळाडूंना नाही. कारण, त्या चिमुकल्याची खेळासाठीची संघर्षमय गाेष्टच त्या सर्वांना प्रेरणादायी ठरणारी अाहे. त्यातूनच सर्वांना प्राेत्साहन मिळते. टाॅमीने  झालेल्या हाेंडा क्लासिक गाेल्फ स्पर्धेत सहभाग घेतला. यादरम्यान त्याने सरस खेळी करताना अनेकांना अाव्हान दिले. त्याने एकाच हाताने उल्लेखनीय कामगिरी केली.  त्याच्या या जिद्द अाणि इच्छाशक्तीचे जपानच्या रियाे इशिकावाने ताेंड भरून काैतुक केले.   
 
‘हा युवा गाेल्फपटू खरच सर्वांसाठी प्रेरणादायी अाहे. त्याने मैदानावर सरस खेळी करून सर्वांचे लक्ष वेधले. त्याला खेळताना पाहताना मला वेगळाच अानंद मिळताे. कारण, त्याची धडपड ही प्राेत्साहित करणारी अाहे,’ असे  इशिकावाने म्हणाले. ‘मी खेळण्यासाठी जाताना टाॅमीला घेऊन जाताे. त्याने दीड वर्षाचा असतानाच गाेल्फची स्टिक हातात पकडली,’असे टाॅमीचे वडील माेरेस यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...