आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : सर्वात मोठी फाईट जिंकणारा संग्रामसिंग गर्लफ्रेंडसोबतच्‍या बोल्‍ड फोटोमुळे होता चर्चेत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संग्रामसिंह गर्लफ्रेंड पायल रोहतगीसह. - Divya Marathi
संग्रामसिंह गर्लफ्रेंड पायल रोहतगीसह.
संग्रामसिंग हा डेथ कॉन्ट्रॅक्ट साइन करून फाइट जिंकणारा देशातील पहिला प्रोफेशनल कुस्तीपटू ठरला आहे. त्याने शनिवारी रात्री कॉमनवेल्थ हेविवेट कुस्ती स्पर्धेत कॅनडाच्या जोलेजेंडला धूळ चारली. यासह भारताचा मल्ल हा ५० लाखांच्या बक्षिसाचा मानकरी ठरला. वर्ल्ड रेसलिंग प्रोफेशनल्सची (डब्ल्यूडब्ल्यूपी) ही फाइट दक्षिण आफ्रिकेच्या पोर्ट एलिझाबेथ येथील नेल्सन मंडेला स्टेडियमवर झाली. काही दिवसांपूर्वी तो गर्लफ्रेंड पायल रोहतगी हिच्याबरोबर रियलिटी डान्स शो 'नच बलिए' मध्ये सहभागी झाल्‍याने चांगलाच चर्चेत आला होता.
संग्रामसिंहने भोपाळमध्ये आयोजित बॉडी ‌बिल्डिंग चॅम्पियनशिप-2011 मध्ये मिस्टर इंडियाचा किताब पटकावला होता. त्यानंतर त्याचवर्षी रशियात झालेल्या 2014 च्या पॅरालम्पिक खेळांचा तो प्रवक्ताही होता. गर्लफ्रेंड पायल बरोबर 2014 मध्ये केलेल्या बोल्ड फोटोशूटमुळेही तो बराच चर्चेत आला होता.

पहिली भेट
संग्राम आणि पायल यांची पहिली भेट टिव्ही रियालिटी शो सर्व्हायवर इंडियामध्ये झाली होती. हळू हळू या दोघांमध्ये मैत्री वाढली आणि प्रेम फुलले. पायल गुजरातच्या अहमदाबादची आहे. या दोघांचा 27 फेब्रुवारी 2014 रोजी साखरपुडाही झाला होता. तेव्हापासून ते एकमेकांबरोबर मोठ्या प्रमाणात सार्वजनिक ठिकाणी दिसून येत होते. पायल राहुल महाजनबरोबरही रिलेशनशीपमध्ये होती, पण त्या दोघांचे नाते फार काळ टिकले नाही.

दमदार बॉडीच्या जोरावर बनवली ओळख
संग्रामने पहिलवान बनल्यानंतर त्याने कधीही मागे वळून पाहिले नाही. पिळदार शरिराच्या जोरावर त्याने ग्लॅमर वर्ल्डमध्येही आपले अस्तित्व प्रस्थापित केले. बहुचर्चित बिग बॉसच्या सातव्या पर्वात तो सहभागी झाल होता. त्याचबरोबर इतरही अनेक शोमध्ये तो सहभागी झाला होता. 'सर्व्हायवर इंडिया' (स्‍टार प्लस), 'सच का सामना' (स्‍टार वन), '100% दे दना दन' (कलर्स) आणि 'राज पिछले जनम का' (इमॅजिन टिवही) अशा शोचा त्यात सहभाग होता.

डेथ कॉन्‍ट्रॅक्‍ट साईन केलेला पहिला भारतीय
2014 मध्येही संग्रामने 'लास्‍ट मॅन स्‍टँड फाइट' अंतर्गत डेथ कॉन्‍ट्रॅक्‍ट साइन केला होता. अशा प्रकारचा कॉन्ट्रॅक्ट साईन करणारा तो पहिला भारतीय होता. या कॉन्ट्रॅक्टनुसार फाईटदरम्यान मृत्यू अथखा जखमी झाल्यास आयोजक त्यात दोषी ठरत नाहीत.

पुढील स्लाइड्सवर पाहा, पायल आणि संग्रामच्या बोल्ड Photoshoot सह इतर फोटो...