आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पॅन पॅसिफिक अाेपन टेनिस स्पर्धेत सानिया-बार्बोरा चॅम्पियन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टाेकियाे - दुहेरीची जगातील नंबर वन सानिया मिर्झाने चेक गणराज्यच्या बार्बोरा स्ट्रायकाेवासाेबत पॅन पॅसिफिक अाेपन टेनिस स्पर्धेत विजेतेपद पटकावले. या दुसऱ्या मानांकित जाेडीने शनिवारी ५१ मिनिटांत महिला दुहेरीचा किताब पटकावला. सानिया अाणि बार्बोराने दुहेरीच्या फायनलमध्ये बिगरमानांकित चेन लियांग अाणि झाअाेक्सुन यांगला पराभूत केले. त्यांनी ६-१, ६-१ अशा फरकाने सामना जिंकला. या जाेडीचे सत्रातील हे दुसरे अजिंक्यपद ठरले. यापूर्वी त्यांनी गत महिन्यात सिनसिनाटी अाेपन स्पर्धेचे विजेतेपद अापल्या नावे केले अाहे.
बातम्या आणखी आहेत...