आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sonika Kaliraman First Fight At 27 December With Pakistan\'s Wrestler

पहिलवान सोनिका पुन्‍हा मैदानात, पाकिस्‍तानी खेळाडूसोबत होणार पहिली फाईट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माजी महिला पहिलवान सोनिका कालीरमनने प्रोफेशनल रेसलिंग जॉईन करण्‍याचा निर्णय घेतला आहे. तिची पहिली फाईट पाकिस्‍तानच्‍या कनाडा येथील पहिलवानसोबत 27 डिसेंबरला होणार आहे. पाच वर्षांपूर्वी सोनिकाने कुस्‍तीला राम राम ठोकला होता. एका मुलाखतीत तिने सांगितले, " सहा महिन्‍यांपूर्वी कॅनडाच्‍या आरबीसी बँककडून प्रो-रेसलिंग जॉईन करण्‍याची ऑफर मिळाली होती. तेव्‍हा माझा मुलगा फक्‍त तीन महिन्‍यांचा होता. त्‍यामुळे मी कॉन्‍ट्रॅक्‍ट साइन केला नाही. मात्र दुस-यांचा संधी मिळाली तेव्‍हा मी तिला नाकारले नाही."
कशी होणार फाईट ?
ही फाईट 5-5 मिनीटाच्‍या तीन फे-यांमध्‍ये होणार आहे. विजेत्‍या खेळाडूचा निर्णय न झाल्‍यास पुढील अर्ध्या तासासाठी फाईट सुरू ठेवण्‍यात येणार आहे. त्‍यामध्‍ये 15 मिनीटाच्‍या कालावधित विश्रांती होणार नाही. अशावेळी दोनपैकी एक कुस्‍तीपटू बेशुद्ध होण्‍याच्‍या स्‍थितीत आल्‍यावर फाईट थांबवण्‍यात येते.
कोन आहे सोनिका?
सोनिका ही प्रसिद्ध पहिलवान चंदगीराम यांची मुलगी आहे. 2010 मध्‍ये तीने रेसलिंगला बाय बाय केला होता. त्‍यानंतर ती अमेरिका येथे बिझनेसमन सिद्धार्थ मलिक यांच्‍याशी लग्‍न करून तेथेच सेटल झाली होती. तिला आता दोन मुलेही आहेत. 2010 मध्‍ये सोनिका बिग बॉस-5 आणि खतरो के खिलाडी-2 मध्‍ये दिसली होती.
पुढील स्‍लाईडवर क्‍लिक करून पाहा, सोनिकाचे काही फोटो..