आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सावधान! स्मार्टफोन, टॅब्लेटमुळे जडतील हे घातक आजार, लहान मुलांनी खेळावे हे खेळ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
क्रिकेट - Divya Marathi
क्रिकेट
स्मार्टफोन, टॅब्लेट ही साधने सतत वापरल्यामुळे डोळे खराब होण्याचा धोका आतापर्यंत सांगितला जात होता. मात्र, सध्या लहान मुलांमध्येही ही साधने मनोरंजनासाठी वापरली जात आहेत. या साधनांवर जास्त वेळ गेम खेळल्याने लहान वयातच मुलांना मानदुखी तसेच मणक्यांच्या दुखण्याला सामोरे जावे लागते. मुले वारंवार पाठ दुखीच्या तक्रारी करतात व पालक त्यावर तात्पुते उपचार करतात. मात्रा असे का होते यांकडे त्याचे साफ दुर्लक्ष होते आणि नंतर हे दुखणे मणक्यांच्या आजारात परावर्तित होते.
स्मार्टफोन, टॅब्लेट अती वापराचे धोके
स्मार्टफोनच्या वापराचे बरेच फायदे आहेत. मात्र यामुळे उद्भवणाऱ्या समस्याही काही कमी नाहीत. यांतून होणाऱ्या किरणोत्सर्गाच्या प्रभावामुळे डीएनएची हानी, रोग प्रतिकारशक्ती कमी होणे, पेशींची हानी, पाठदुखी, मेलाटोनीनची पातळी कमी होणे, अशा अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.
लहान वयात मुलांनी खेळावे हे खेळः
घरात कुठलेही गॅजेट्स असेल तर मुले घराबाहेर पडत नाही. स्मार्टफोन अथवा टॅब्लेटचा सर्वाधिक उपयोग करतात. त्यातच त्यांना अधिक रस असतो. याचे प्रमाण वाढले की मग, त्याचा शरीरावर ताण येतो. त्यामुळे मैदानी खेळ अत्यंत महत्त्वाचे ठरत आहेत. याने मुलांची चांगली वाढ होते परिणामी त्यांचे आरोग्यदेखील चांगले राहते.
लाइफस्टाइल बदला
- गॅजेट्स वापरायची वेळ ठरवून घेण्याची गरज. त्यातूनच होतो आरोग्याचा फायदा.
- लॅपटॉपला जमिनीवर अथवा उशीवर ठेवून वापरण्यापेक्षा त्याला संगणक टेबलवर ठेवून वापरायला हवा.
गेमची स्टेज वारंवार क्रास झाल्यानंतर तो बंद करायला पाहिजे. मात्र, मन ऐकत नाही म्हणून ते खेळणे सुरूच राहते. त्यातून थोड्या काळासाठी ब्रेक घ्यायला हवा. मात्र तसेही होताना दिसत नाही.
पुढील स्लाइड्सवर पाहा काही असे खेळ, जे ठरतील तुमच्या व तुमच्या मुलांच्या आरोग्यासाठी वरदान...