आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

DvM SPL: क्रीडामंत्र्यांकडे स्वतंत्र कारभार नाही, संचालकपदाची सूत्रे प्रभारीकडे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अाैरंगाबाद- क्रीडामंत्री विनाेद तावडे यांच्याकडे स्वतंत्र कारभार नाही, संचालनालयात कायमस्वरूपी क्रीडा संचालक नाही, उपसंचालकांसह राज्यभरात जिल्हा अाणि तालुका क्रीडा अधिकाऱ्यांची पदे माेठ्या संख्येत रिक्त, हे विदारक अाणि चिंताजनक असे चित्र चक्क महाराष्ट्रात दिसून येत अाहे.

एकीकडे जागतिक स्तरावरील स्पर्धेत महाराष्ट्रीयन खेळाडूंचा टक्का वाढवण्याच्या माेठ्या प्रमाणात वल्गना केल्या जात अाहेत. मात्र,त्यासाठी अावश्यक असणाऱ्या तज्ज्ञ ‘मॅन पाॅवर’ची राज्यभरात वानवा अाहे. त्यासाठी पाेषक असणाऱ्या सुविधांच्या अभावामुळे  क्रीडा क्षेत्राचा नुसताच खेळखंडाेबा हाेऊन बसला अाहे. त्यामुळे खेळाडूंच्या प्रतिभेला चालना मिळेनाशी झाली अाहे.   

मार्गदर्शकाविना खेळाडू वाऱ्यावर
राज्यातील युवा खेळाडूंची प्रतिभा अाता अडचणीत सापडली अाहे. कारण जिल्ह्याच्या ठिकाणी क्रीडा मार्गदर्शकाची उणीव अाहे. त्यामुळे खेळाडू वाऱ्यावर अाहेत. मागील चार वर्षांपासून ही पदे अद्याप भरण्यात अालेली नाहीत.  अपुऱ्या मार्गदर्शकाच्या बळावर प्रभारीची कसरत हाेत अाहे. जिल्हा क्रीडा अधिकारी म्हणून कार्यरत काही अधिकाऱ्यांवर दुसऱ्या जिल्ह्याचीही जबाबदारी साेपवण्यात अाली अाहे. त्यामुळे प्रभारी म्हणून कार्य करताना या अधिकाऱ्यांची कसरत हाेेते.

क्रीडामंत्र्यांची कसरत; ६ खात्यांचा कारभार 
राज्यातील क्रीडामंत्री विनाेद तावडे यांनाच कॅबिनेटमंत्री म्हणून राज्यात माेठी कसरत करावी लागत असल्याचे दिसते. त्यांच्याकडे क्रीडासह  शालेय शिक्षण, उच्च व तंत्रशिक्षण, मराठी भाषा, सांस्कृतिक कार्य अाणि अल्पसंख्याक विकास व वक्फसारख्या सहा खात्यांचा कारभार अाहे. 

संचालकची तीन महिन्यात उचलबांगडी 
राज्यातील क्रीडा व युवक कल्याण संचालनालयाच्या नेतृत्वाची सूत्रे अाता पुन्हा एकदा प्रभारी पदावर कार्यरत असलेल्या व्यक्तीकडे गेली अाहेत.विजय झगडे यांची जूनमध्ये  नियुक्ती केली. मात्र,  त्यांची उचलबांगडी झाली.

पदाेन्नतीचा निर्णय कागदाेपत्री 
रिक्त असलेल्या जिल्हा क्रीडा अधिकारी अाणि क्रीडा अधिकारी पदासाठीची पदाेन्नतीही जाहीर झाली अाहे. मात्र, ही अाता केवळ कागदाेपत्रीच ठरत अाहे. कारण, अद्याप यासंबंधी त्या त्या विभागांकडे रखडली.

प्रस्ताव धूळ खात : राज्यातील क्रीडा क्षेत्राला चालना देणारे  प्रस्ताव  धूळ खात अाहेत. यामुळे  अडसर निर्माण झाला.    
माेजके निर्णय : तालुका क्रीडा समिती पुनर्रचना, राज्यातील क्रीडा संकुल बांधणी, मिशन २०२० चे महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. मात्र, याला चालना देणारे मनुष्यबळच राज्यात नाही.
बातम्या आणखी आहेत...