आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

36 वर्षानंतर ऑलिंपिकसाठी पात्र झालेला भारतीय धावपटू डोपिंग टेस्टमध्ये फेल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतीय धावपटू धर्मवीर सिंग - Divya Marathi
भारतीय धावपटू धर्मवीर सिंग
नवी दिल्ली- रिओ ऑलिंपिक सुरु होण्याआधी भारताला आणखी एक झटका बसला आहे. 200 मीटर रेसमध्ये पात्र झालेला धर्मवीर सिंग डोपिंग टेस्टमध्ये दोषी आढळला आहे. यामुळे तो मंगळवारी रिओला जावू शकला नाही. याआधी शॉटपुटर इंद्रजित सिंग आणि नरसिंग यादव डोपिंग टेस्टमध्ये फेल झाले होते. 36 वर्षानंतर भारतीय झाला होता ऑलिंपिकला पात्र...
- बंगळुरूमध्ये झालेल्या इंडियन ग्रां प्री अॅथलेटिक्स इव्हेंटमध्ये धर्मवीरने 20.45 सेकंदात धावून ऑलिंपिकसाठी पात्र होण्यासाठी लागणा-या 20.50 सेकंदाचा टप्पा पूर्ण केला होता.
- तो 36 वर्षानंतर ऑलिंपिक क्वालीफाय करणारा इंडियन अॅथलीट बनला होता.
- धर्मवीरने आतापर्यंत नॅशनल गेम्समध्ये 100 व 200 मीटर रेसमध्ये सहा गोल्ड, एक सिल्वर आणि एक ब्राँझ मेडल जिंकले होते.
- 2015 मध्ये 21 व्या एशियन चॅम्पियनशिपदरम्यान धर्मवीरने 22.66 सेकंदाच्या टायमिंगसह मिल्‍खा सिंग यांचा विक्रम मोडित काढला होता.
- LIC एजंट म्हणून नोकरी करणा-या व त्यातून मिळणा-या तुटपूंज्या पगारातून धर्मवीर सिंगने धावण्याची आवड जोपासली.
- धर्मवीरला LIC एजंट म्हणून नोकरी करताना केवळ 16 हजार पगार मिळायचा. तर त्याचा महिन्याचा खर्च होता 40 हजार.
- दुसरीकडे, यापूर्वीच डोप टेस्टमध्ये फेल झालेल्या नरसिंग यादव आणि इंद्रजित सिंग यांचेही रिओवारी अजून पक्की झाली नाही.
मिल्खाचा विक्रम मोडून धर्मवीर आला होता चर्चेत-
- धर्मवीरने चीनमध्ये झालेल्या अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये फ्लाईंग शिख मिल्खा सिंग यांचा विक्रम तोडला होता.
- ही चॅम्पियनशिप वर्ष 2015 मध्ये 3 ते 7 जून दरम्यान झाली होती. त्याने ही रेस 20.7 सेकंदात पूर्ण केली होती.
- मिल्खा सिंग यांचा 21.6 सेकंदाचा विक्रम होता.
पुढे वाचा, 36 वर्षानंतर ऑलिंपिकसाठी पात्र झालेला धर्मवीर सिंग आहे तरी कोण...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...