आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्क्वॅश: व्हिक्टोरियन चॅम्पियनशिपमध्ये जोश्ना चिनप्पा चॅम्पियन; लिने हान्सेनचा पराभव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मेलबर्न- भारताची अव्वल खेळाडू जोश्ना चिनप्पा व्हिक्टोरियन स्क्वॅश स्पर्धेत चॅम्पियन ठरली. तिने रविवारी महिला एकेरीचा किताब आपल्या नावे केला. तिसऱ्या मानांकित जोश्नाने फायनलमध्ये लिने हान्सेनचा पराभव केला. तिने ११-५, ११-४, ११-९ अशा फरकाने विजय मिळवला. यासह तिने जेतेपदावर नाव . दुसरीकडे लिनेला परा ओपन भवामुळे उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

भारताच्या जोश्नाने लिनेविरुद्ध विजयी अओपन आघाडी घेतली. या दोन्ही खेळाडूंमध्ये आतापर्यंत तीन सामने रंगले. यात जोश्नाने रविवारी बाजी मारून लिनेविरुद्ध २-१ ने आघाडी मिळवली. तिने गत एप्रिलमध्ये रिचमंड स्क्वॅश चॅम्पियनशिपमध्ये लिनेवर मात केली होती.
दोन्ही खेळाडूंमध्ये अंतिम सामन्यात चुरस रंगली होती. मात्र, जोश्नाने सरस खेळी करून पहिल्याच सेटमध्ये बाजी मारली व आघाडी मिळवली. दरम्यान, दुसऱ्या मानांकित लिनेने कमबॅक करून जोश्नाला रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिला समाधानकारक खेळी करता आली नाही.

रेयान ठरला पुरुष गटाचा विजेता
ऑस्ट्रेलियाच्या रेयान कुस्केलीने पुरुष गटात जेतेपदावर नाव . त्याने एकेरीच्या फायनलमध्ये स्कॉटलंडच्या ग्रेग लोब्बानला धूळ चारली. त्याने १२-१०, १३-११, ११-९ अशा फरकाने विजय मिळवला. या विजयासह त्याने किताब पटकावला. विजयासाठी झुंज देणाऱ्या ग्रेगला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
ऑस्ट्रेलियन ची तयारी!
लवकरच ऑस्ट्रेलियन स्क्वॅश स्पर्धेला सुरुवात होत आहे. या स्पर्धेतही एकेरीचा किताब जिंकण्याचा जोश्नाचा प्रयत्न अाहे. राष्ट्रीय आणि व्हिक्टोरिन च्या जेतेपदामुळे आता जोश्नाचा आत्मविश्वास दुणावला आहे. त्यामुळे आता ऑस्ट्रेलियन चाही किताब ओपल्या नावे करण्याचा नॅशनल चॅम्पियन जोश्नाचा प्रयत्न आहे. यासाठी तिने लवकरच तयारीला प्रारंभ करणार असल्याचे सांगितले. आता तिला सलग तिसऱ्या अजिंक्यपदावर नाव काेरण्याची संधी आहे.
सलग दुसरे जेतेपद पटकावले
राष्ट्रीय स्पर्धेतील जेतपेदाने जोश्नाचा आत्मविश्वास द्विगुणीत झाला. त्यामुळे तिने या स्पर्धेतील विजयाची लय कायम ठेवताना सलग दुसऱ्या जेतेपदाचा बहुमान पटकावला. याशिवाय तिने मेलबर्न येथील स्पर्धेत आपली चमक दाखवली. अव्वल खेळाडूंना धुळ चारून तिने अंतिम फेरीपर्यंतचा पल्ला यशस्वीपणे गाठला. याशिवाय तिने लिनेविरुद्ध फायनलमध्येही वर्चस्व कायम ठेवले. त्यामुळे तिला अंतिम सामन्यात विजय मिळवता आला.
१५ हजार डॉलरची मानकरी
भारताची युवा खेळाडू जोश्ना चिनप्पा सलग दुसऱ्या अजिंक्यपदासह स्पर्धेत १५ हजार डाॅलरची मानकरी ठरली. तिला जेतेपद देऊन गौरवण्यात आले. याशिवाय तिने आपल्या करियरमध्ये नावे डब्ल्यूएसएचा दहाव्या जेतेपदाचा मान पटकावला.
अशा फरकाने जोश्नाचा विजय
११-५
११-४
११-९
बातम्या आणखी आहेत...