आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीसंथने दिली दुस-या देशाकडून खेळण्‍याची धमकी, BCCIने दिले असे उत्‍तर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दुबई- क्रिकेटर एस. श्रीसंथने दुस-या देशाकडून खेळण्‍याचा इशारा दिला आहे. श्रीसंथवर देशाकडून क्रिकेट खेळण्‍यासाठी बीसीसीआयने आजीवन बंदी घातली आहे. यावर केरळ हायकोर्टात दाखल याचिकेवर सुनावणी करताना केरळ हायकोर्टाने बीसीसीआयचा हा निर्णय कायम ठेवला आहे.  यावर बोलताना श्रीसंथने बीसीसीआयला हा ईशारा दिला आहे.   
 
काय म्‍हणाला श्रीसंथ?
- दुबईमध्‍ये एका कार्यक्रमात श्रीसंथने यासंबंधी व्‍यक्‍तव्‍य केले. श्रीसंथ म्‍हणाला, 'बीसीसीआयने माझ्यावर बंदी घातली आहे. आयसीसीने नव्‍हे. मी सध्‍या 36 वर्षांचा आहे. अजुन 6 वर्षे तरी क्रिकेट खेळू शकतो.'
- श्रीसंथ पुढे म्‍हणाला की, 'माझे क्रिकेटवर अतिशय प्रेम आहे. एक व्‍यक्‍ती म्‍हणून मी क्रिकेट खेळू इच्छितो. तुम्‍ही तर जाणताच की, बीसीसीआय ही एक खासगी संस्‍था आहे. तीच आपल्‍याला सांगते की, त्‍यांची टीम ही भारतीय टीम आहे.'

बीसीसीआयने असे दिले उत्‍तर
- श्रीसंथच्‍या व्‍यक्‍त्‍यावर बीसीसीआयचे सचिव अमिताथ चौधरी यांनी उत्‍तर दिले आहे.
- त्‍यांनी सांगितले की, 'कोणत्‍याही खेळाडूवर जेव्‍हा आयसीसीचा पूर्ण सदस्‍य असलेला देश बंदी घालतो, तेव्‍हा तो खेळाडू आयसीसीच्‍या इतर सदस्‍य देशांसोबत किंवा संस्‍थेसोबतही क्रिकेट खेळू शकत नाही. श्रीसंथच्‍या वक्‍तव्‍यांना कशाचाही आधार नाही. आम्‍हाला आमची कायदेशीर बाजू पूर्णपणे माहिती आहे.
 
श्रीसंथवर केव्‍हा आणि का घातली होती बंदी 
-  2013 साली आयपीएलच्‍या 6व्‍या सीझनमध्‍ये स्‍पॉट फिक्सिंग केल्‍याप्रकरणी बीसीआयने श्रीसंथवर आजन्‍म क्रिकेटची बंदी घातली होती. 
- त्‍यामुळे श्रीसंथ बीसीसीआय व त्‍यांच्‍याशी संबंधित इतर संस्‍थाकडून क्रिकेट खेळू शकत नाही.
 
बातम्या आणखी आहेत...