आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीलंकेत घोड्यावर नव्हे रिक्षात बसून खेळतात पोलो, नाव ‘टुक-टुक पोलो’

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दोन वेगवेगळ्या रिक्षांमध्ये बसलेल्या टीम परस्परांच्या विरोधात गोल करण्याचा प्रयत्न करत असतात. - Divya Marathi
दोन वेगवेगळ्या रिक्षांमध्ये बसलेल्या टीम परस्परांच्या विरोधात गोल करण्याचा प्रयत्न करत असतात.
स्पोर्ट्स डेस्क- आतापर्यंत आपण हॉर्स पोलो, वॉटर पोलो, स्नो हॉर्स पोलो, सायकल पोलो किंवा एलिफंट पोलोबाबत ऐकले होते. आता या यादीत आणखी एक नवे नाव सामाविष्ट झाले आहे. हे नाव आहे "टुक-टुक पोलो', म्हणजे ऑटोत बसून खेळले जाणारे पोलो. ऐकायला थोडे अजब वाटते. मात्र, हा खेळ श्रीलंकेत सुप्रसिद्ध आहे.
 
आता तर या खेळाच्या स्पर्धांचे आयोजनही होऊ लागले आहे. ही स्पर्धा पयर्टकांतही लोकप्रिय ठरत आहे. पहिली "टुक-टुक पोलो' स्पर्धा मार्च २०१३ मध्ये गॉल डच फोर्टवर झाली. या खेळात एका संघात तीन खेळाडू असतात. याला ड्रायव्हर कंट्रोल करतो आणि मागच्या सीटवर खेळाडू बसलेला असतो. पुरुष आणि महिला खेळाडू दोन्ही असतात. पुरुष खेळाडू उजव्या हाताने पोलो स्टिक पकडतो, तर महिला दोन्ही हाताचा उपयोग करू शकते. यात एक पंच खेळावर लक्ष ठेवतो.
 
पुढील स्लाईड्सवर पाहा, टूक टूक पोलोचे काही PHOTOS
बातम्या आणखी आहेत...