आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

डॅनविरुद्ध काट्याची लढत देऊन भारताचा के. श्रीकांत पराभूत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रिअाे अाॅलिम्पिकमधील अत्यंत प्रेक्षणीय लढतींपैकी एक ठरलेल्या लढतीत भारताचा किदाम्बी श्रीकांत चीनच्या दाेन वेळच्या अाॅलिम्पिक विजेत्या लिन डॅनकडून अत्यंत संघर्षपूर्ण लढतीत पराभूत झाला. तिसऱ्या गेममध्ये अगदी अखेरच्या टप्प्यात सुपर डॅनने त्याचा अनुभव पणाला लावत श्रीकांतवर मात केली. भारताचा युवा बॅडमिंटनपटू के. श्रीकांत बुधवारच्या सामन्यात लिन डॅनकडून ६ -२१, २१ -११ अाणि १८ -२१ असा पराभूत झाला असला तरी त्याने समस्त भारतीयांची मने जिंकली. २०१४ साली श्रीकांतने लिन डॅनला चायना अाेपनमध्ये पराभूत केल्याचा वचपा त्याने या लढतीत काढला. पहिला गेम लिन डॅनने ६ -२१ असा सहज जिंकल्यानंतर श्रीकांतने पुनरागमन करीत दुसरा गेम २१ -११ असा जिंकत सामन्यात १- १ अशी बराेबरी साधली. त्यानंतर तिसऱ्या गेममध्ये १३ -१० अशी अाघाडीदेखील घेतली. मात्र, त्यानंतर लागाेपाठ गुण घेत लिन डॅनने हा गेम २१ -१८ असा जिंकत सामना खिशात घातला. भारतीय खेळाडूने सामना गमावला, मने मात्र जिंकली.
बातम्या आणखी आहेत...