आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता उत्तीर्ण, अनुत्तीर्ण खेळाडूंना ग्रेस गुण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - राज्य शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या नव्या अध्यादेशानुसार २०१५-१६ या शैक्षणिक वर्षापासून १० व १२ वीतील उत्तीर्ण असो िकंवा अनुत्तीर्ण खेळाडूंना ते ज्या स्पर्धांमध्ये खेळले त्या स्पर्धांसाठी निश्चित करण्यात आलेले गुण िमळतील. याआधी जे खेळाडू अनुत्तीर्ण होणार असतील त्यांनाच उत्तीर्ण होण्यासाठी २५ ग्रेस गुण िदले जायचे.
या वेळी गुण देताना शिक्षण विभाग खेळाडूंच्या गुणांची (परीक्षा+खेळ) एकूण सरासरी १०० टक्क्यांपेक्षा जास्त जाणार नाही, याची काळजी घेणार आहे. यामुळे उत्तीर्ण होणाऱ्या खेळाडंूच्या टक्केवारीत वाढ होईल, तर अनुत्तीर्ण खेळाडूला उत्तीर्ण होण्यास मदत िमळेल. यासाठी मान्यताप्राप्त संघटनेने अधिकृत कागदपत्रे क्रीडा संचालनालय पुणे व संबंधित जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाकडे स्पर्धा आटोपल्यानंतर एका आठवड्याच्या आत पाठवायची आहेत. ग्रेस गुणांसाठी खेळाडूंना शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांच्या मुख्याध्यापकांकडे अर्ज सादर करावा लागेल. १ जून २०१५ ते २८ फेब्रुवारी २०१६ हा कालावधी ग्रेस गुणांसाठी वैध समजला जाणार आहे. केवळ १७ व १९ वर्षांखालील खेळाडूंनाच या ग्रेस गुणांचा फायदा होईल.

अशी होणार गुणांची विभागणी
आंतरराष्ट्रीय स्पर्धा प्रावीण्य तसेच सहभागासाठी २५ गुण.
राष्ट्रीय स्पर्धा
प्रथम तीनसाठी २५ गुण, सहभागासाठी मिळेल २० गुण.
राज्य स्पर्धा
प्रथम तीनसाठी २० गुण, सहभागासाठी मिळतील १५ गुण.
४७ क्रीडा प्रकारांनाच गुण : भारतीय शालेय क्रीडा महासंघ, क्रीडा प्राधिकरण पुरस्कृत खेळ, शासनाच्या सुब्रतो मुखर्जी फुटबाॅल चषक, जवाहरलाल नेहरू हाॅकी चषक, विनू मंकड, सीके नायडू क्रिकेट, केंद्र मान्यताप्राप्त खेळ, भारतीय आॅलिम्पिक व महाराष्ट्र आॅलिम्पिक संघटनेशी संलग्न खेळांच्या राज्य संघटनांद्वारे आयोजित आॅलिम्पिक दर्जाच्या ४७ क्रीडा प्रकारांसाठी गुण.

^ शासनाने ग्रेस गुणांबाबत केलेल्या कडक िनयमांमुळे अाजवर कागदावर अर्थात स्पर्धा न खेळता गैरमार्गाने प्रमाणपत्र िमळवणाऱ्या खेळाडूंवर वचक बसेल. यामुळे प्रामाणिक खेळाडूंवर अन्याय होणार नाही.
अविनाश पुंड, जिल्हा क्रीडा अधिकारी, अमरावती
बातम्या आणखी आहेत...