आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Stan Wawarinka Won Chennai Open Tennis Tournament

चेन्नई ओपन टेनिस : वावरिंकाची अजिंक्यपदाची हॅट‌‌ट्रिक बोर्ना सोलिच उपविजेता

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चेन्नई - जागतिक क्रमवारीत चाैथ्या स्थानावर असलेला स्टॅन वावरिंका चेन्नई अाेपन टेनिस स्पर्धेत तिसऱ्यांदा चॅम्पियन ठरला. त्याने रविवारी स्पर्धेत पुरुष एकेरीचा किताब पटकावला. वावरिंकाने फायनलमध्ये बाेेर्ना काेरीचचा पराभव केला. त्याने ६-३, ७-५ अशा फरकाने विजयाची नाेंद केली. त्याने एक तास २६ मिनिटांत फायनलमध्ये विजयश्री खेचून अाणली. या सामन्यातील पराभवाने बाेर्नाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

राअाेनिकला जेतेपद :
कॅनडाचा मिलाेस राअाेनिकने पुरुष एकेरीचा किताब पटकावला. त्याने ब्रिस्बेन अांतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेचा किताब पटकावला. त्याने फायनलमध्ये स्विसकिंग राॅजर फेडररचा ६-४, ६-४ ने पराभव केला. या पराभवामुळे फेडररला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

याेकाेविक चमकला :
याेकाेविक कतार अाेपनच्या फायनलमध्ये चमकला. त्याने माजी नंबर वन नदालचा पराभव केला. याेकाेविकने ६-१, ६-२ ने विजय मिळवला. माजी नंबर वन राफेल उपविजेता ठरला.