आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पॅरिस मास्टर्स टेनिस स्पर्धा : वावरिंका, डेव्हिड फेररची तिसऱ्या फेरीत धडक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पॅरिस - फ्रेंच अाेपन चॅम्पियन स्टॅन वावरिंका अाणि स्पेनच्या डेव्हिड फेररने पॅरिस मास्टर्स टेनिस स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत धडक मारली. दुसरीकडे जगातील नंबर वन राफेल नदालला पुरुष दुहेरीच्या सलामीला पराभवाचा सामना करावा लागला.

वावरिंकाने पुरुष एकेरीच्या दुसऱ्या फेरीत बर्नाड टाॅमिकचा पराभव केला. त्याने ६-३, ७-६ अशा फरकाने शानदार एकतर्फी विजयाची नाेंद केली. यासह त्याला पुढच्या फेरीतील अापला प्रवेश निश्चित करता अाला. बर्नाडने दुसऱ्या सेटमध्ये दमदार पुनरागमन करताना चाेख प्रत्युत्तराची खेळी केली. त्याने वावरिंकाला राेखण्यासाठी अाक्रमक सर्व्हिसवर भर दिला. त्यामुळे हा सेट टायब्रेकरपर्यंत खेचला गेला. मात्र, सरस खेळी करून वावरिंकाने ७-६ ने सेट जिंकून सामना अापल्या नावे केला. दुसरीकडे अाठव्या मानांकित फेररनेही दुसऱ्या फेरीत शानदार विजय संपादन केला. त्याने अलेक्झेंडर डाेगाेल्पाेलाेवचा पराभव केला. २०१२ चा चॅम्पियन फेररने ६-२, ६-२ ने सरळ दाेन सेटमध्ये सामना जिंकला.

पेस-नदालचा पराभव
यंदाच्या सत्रात गंभीर दुखापतीने त्रस्त असलेल्या राफेल नदालचे पुरुष दुहेरीतील अाव्हान पहिल्याच फेरीत संपुष्टात अाले. भारताच्या लिएंडर पेससाेबत दुहेरीत प्रथमच नशीब अाजमावणाऱ्या नदालला समाधानकारक खेळी करता अाली नाही. इंग्लंडचा डाेमिनिक इंगलाेट अाणि स्वीडनच्या राॅबर्ट लिडस्टेड्ने नदाल-पेसचा पराभव केला. त्यांनी ६-३, ६-४ ने विजय मिळवला.
बातम्या आणखी आहेत...