आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Stanislas Wawrinka Shrugs Off Personal Problems To Win French Open

‘बिग फाेर’ची बराेबरी करणे अशक्य, फ्रेंच अाेपन चॅम्पियनची कबुली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पॅरिस - टेनिसच्या विश्वातील राफेल नदाल, नाेवाक याेकाेविक, राॅजर फेडरर अाणि अँडी मरे या ‘बिग फाेर’ची बराेबरी करणे अशक्य अाहे. कारण हे सर्वच खेळाडू दिग्गज अाहेत, अशी कबुली फ्रेंच अाेपन चॅम्पियन स्टॅन वावरिंकाने दिली. त्याने रविवारी या स्पर्धेत पुरुष एकेरीचा किताब पटकावला. स्विसच्या वावरिंकाने अंतिम सामन्यात जगातील नंबर वन नाेवाक याेकाेविकचा पराभव करून हा पराक्रम अापल्या नावे केला.
‘टेनिसमधील या चार दिग्गजांना मी ग्रँडस्लॅम स्पर्धेत हरवले अाहे. त्यांना मी सेमीफायनल अाणि फायनलमध्ये धूळ चारली. मात्र, तरी हे चारही खेळाडू माेठे अाहेत. मी त्यांची बराेबरी करू शकत नाही. मी केवळ कामगिरीचा दर्जा उंचावू शकताे,’ असेही स्विसच्या ३० वर्षीय वावरिंकाने सांगितले.
फ्रेंंच अाेपनचे विजेतेपद पटकावून वावरिंकाने मेट्स व्हिलेंडर अाणि इवान लेंडल यांच्या यादीत स्थान मिळवले अाहे. त्याने राेलां गॅराेमध्ये युवा अाणि सीनियर गटात हे जेतेपद जिंकले. त्याचे हे करिअरमधील दुसरे ग्रँडस्लॅम अाहे. यापूर्वी वावरिंकाने गतवर्षी अाॅस्ट्रेलियन अाेपन टेनिस स्पर्धा जिंकली. क्रमवारीतही त्याची प्रगती झाली आहे.
विजय सोपा नव्हता...
^योकोविकविरुद्ध विजय मिळवणे सोपे नव्हते. योकोविक पूर्ण लयीत नसल्याने फायदा झाला. या विजयाने मी आनंदी आहे.
वावरिंका, फ्रेंच ओपन चॅॅम्पियन