आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Star Drag Flicker Rupinder Pal Singh India Fourth Asian Champions Trophy

रुपिंदरसिंगच्या दोन गोलमुळे भारताची मलेशियावर मात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कुआंटन- स्टारड्रग फ्लिकर रूपिंदर पाल सिंगच्या पेनॉल्टी कॉर्नरच्या शानदार दोन गोलच्या बळावर भारताने रोमांचक लढतीत यजमान मलेशियावर २-१ ने पराभूत करत एशियन चॅम्पियन ट्रॉफी हॉकी स्पर्धेत आपले अव्वल स्थान मजबूत केले. भारताचा हा चौथा विजय ठरला.

भारत १३ गुणांसह अव्वल स्थानावर पोहोचला. मलेशियाचे चार सामन्यांत गुण असून दुसऱ्या स्थानावर आहे. भारत आणि यजमान मलेशियान स्पर्धेतील उपांत्य फेरीचे स्थान निश्चित केले आहे.

रूपिंदरने १२ व्या मिनिटाला पेनॉल्टी कॉर्नरवर गोल करत भारताला १-० ने आघाडी मिळवून दिली. मलेशियाने १८ व्या मिनिटाला रेजी रहीमच्या गोलवर १-१ ने बरोबरीने साधली. लढतीच्या ५८ व्या मिनिटांपर्यंत बरोबरीत चालणाऱ्या सामन्यात अखेरच्या क्षणी रूपिंदरने पुन्हा पेनॉल्टी कॉर्नरवरून गोल करत संघाला २-१ ने विजय मिळवून दिला. भारताने स्पर्धेत जबरदस्त प्रदर्शन करताना चीन, पाकिस्तान आदी दिग्गज आशियाई संघांना पराभूूत केले. कोरियाविरुद्ध भारताचा सामना मात्र बरोबरीत सुटला.
बातम्या आणखी आहेत...