आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कर चुकवेगिरीमुळे फुटबॉलर मेस्सीला 21 महिन्यांचा तुरुंगवास, 15 कोटीचा दंडही

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बार्सिलोना- अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलर लियोनेल मेस्ला टॅक्स चोरल्या प्रकरणात 21 महिन्याचा तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणात त्याचे वडिल जॉर्ज एच मेस्सी यांनाही दोषी धरले आहे. मेस्सीला 14.9 कोटी रुपये आणि त्याच्या वडिलांना 11.3 कोटी रूपयांचा दंड ठोठावला आहे. स्पॅनिश कोर्टाने दिला निर्णय...
- बार्सिलोनामध्ये बुधवारी स्पॅनिश कोर्टाने हा निर्णय दिला.
- मेस्सीवर टॅक्स चोरीचे 3 खटले सुरु होते.
- मेस्सी स्पेनच्या वार्सिलोना क्लबकडून खेळतो.
कोर्टात मेस्सीने काय सांगितले?
- मेस्सीने सांगितले की, मला आर्थिक नियोजन व व्यवस्थानाबाबत माहिती नाही. मी तर फक्त फुटबॉल खेळण्याचे काम करतो व त्यात बिजी असतो.
- त्याच्या वडिलावर असा आरोप आहे की, वडील जॉर्जने उरुग्वे आणि बेलिज देशात इमेज राईटमधून कमाई केली आहे.
जेलमध्ये जाणे टळू शकते
- मेस्सी आणि त्याचे वडील सध्या तरी जेलमध्ये जाण्यापासून वाचू शकतात.
- स्पॅनिश व्यवस्थेत 2 वर्षापेक्षा कमी तुरुंगवासाची शिक्षा झालेल्यांना अंडर प्रोबेशनवर ठेवले जाते.
काय आहेत आरोप?

- मेस्सी आणि त्याचे वडील यांच्यावर 2006-09 या दरम्यान 'शेल कंपन्या' द्वारे 29.9 कोटी रुपये (40 लाख यूरो) गैरव्यवहार केल्याचा ठपका ठेवला आहे.
- शेल अशा कंपनीला म्हटले जाते जे नावाला असते पण काहीही व्यवसाय करीत नाही.
- 2013 मध्ये हे प्रकरण समोर आल्यानंतर मेस्ने आतापर्यंत 50 लाख यूरो (37.4 कोटी रुपये) भरले आहेत.
मेस्सीची वार्षिक कमाई 543 कोटी रूपये
- मेस्सीची वार्षिक कमाई 543 कोटी रूपये आहेत. यात सॅलरी 357 कोटी तर एंडोर्समेंटमधून 186 कोटू रूपये मिळतात.
- तो रियल माद्रिदचा स्टार फुटबॉलर क्रिस्टियानो रोनाल्डो (586.7 कोटी रूपये) नंतर सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू आहे.
नुकतीच घेतलीय आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती
- मेस्सीने नुकतीच आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली आहे.
- हा निर्णय त्याने अचानक घेतला होता. जेव्हा कोपा कपमध्ये संघाला तो विजेतेपद जिंकून देऊ शकला नाही.
- मेस्सीला रिअ ऑलिंपिकच्या निवडलेल्या राष्ट्रीय संघात स्थान मिळाले नव्हते.
- यामुळेच निराश असल्याचे सांगण्यात येते. मेस्सीने अर्जेंटिनासाठी रिकॉर्डब्रेक 55 गोल केले आहेत.
पुढे वाचा, मेसीच्या नावावर अनेक विक्रम-
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...