आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यस्तरीय मैदानी स्पर्धा आजपासून

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे आणि औरंगाबाद क्रीडा कार्यालयातर्फे राज्यस्तरीय शालेय अॅथलेटिक्स स्पर्धेचे १२ ते १६ डिसेंबरदरम्यान विभागीय क्रीडा संकुलात अायोजन करण्यात आले आहे. स्पर्धेत १७ व १९ वर्षांखालील मुलामुलींच्या गटात ९ विभागांतील एकूण १५७० खेळाडू, मार्गदर्शक सहभागी होतील. स्पर्धेला सोमवारी सकाळी ८ वाजता सुरुवात होईल. खेळाडूंची निवास आणि भोजनव्यवस्था संकुलात करण्यात आली आहे. नवोदित युवा खेळाडूंना, शाळा-महाविद्यालयातील खेळाडूंना राष्ट्रीय दर्जाच्या खेळाडूंचा खेळ पाहण्याची संधी आहे. संकुलात सर्वांसाठी प्रवेश मोफत असल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी ऊर्मिला मोराळे यांनी दिली.
बातम्या आणखी आहेत...