आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

३०० च्या स्पीडने कारची धडक; गाडीचा चुराडा, सुखरूप बाहेर पडला फर्नांडो अलोन्सो

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मेलबर्न (ऑस्ट्रेलिया) - मॅक्लारेनचा स्पॅनिशन ड्रायव्हर फर्नांडो अलोन्सोसाठी रविवारचा दिवस लकी ठरला. अल्बर्ट पार्क सर्किटवर त्याच्या गाडीचा चुराडा झाला. मात्र, त्याला थोडेही खरचटले नाही. तो व्यवस्थित गाडीबाहेर पडला. ऑस्ट्रेलियन ग्रांप्री फॉर्म्युला वन फायनल रेसच्या १७ व्या लॅपच्या वेळी अलाेन्सोची कार हवेत दोन वेळा फ्लिप होऊन सुरक्षा गेटला जाऊन भिडली. या वेळी अलोन्सोच्या गाडीचा वेग ताशी ३०० किमी इतका होता. याआधी त्याची गाडी एस्टिबेन गुटिएरेजच्या कारलाही भिडली होती.

निकाे रोसबर्ग चॅम्पियन
मर्सिडीझचा जर्मन ड्रायव्हर निकाे रोसबर्गने सत्रातील पहिली रेस जिंकली. त्याने ३०८ किमीची ५८ फेरीची ही रेस १:३८:१५ तासांत पूर्ण केली. इंग्लंडचा लुईस हॅमिल्टन दुसरा आणि फेरारीचा सेबेस्टियन वेटेल तिसरा आला.
पुढील स्लाइड्सवर पाहा, या अपघाताचे PHOTOS
बातम्या आणखी आहेत...