आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

याला म्हणतात जिद्दः हा आहे जगातला पहिला हात नसलेला रेसिंग ड्रायव्हर,

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाॅर्सा - पोलंडचा बार्टेक ओस्टालोवस्की जगातला पहिला हात नसलेला रेसिंग ड्रायव्हर आहे. २००६ मध्ये एका अपघातात त्याने हात गमावले होते. यानंतरही ओस्टालोवस्कीने रेसर बनण्याचे आपले स्वप्न भंगू दिले नाही. तो पायाने कार चालवण्यास शिकला. २००९ मध्ये तो दोन्ही हात नसताना इंटरनॅशनल रेसिंग लायसन्स मिळवणारा पहिला ड्रायव्हर बनला.
ओस्टालोवस्कीने सामान्य रेसरप्रमाणे युरोपियन चॅम्पियनशिप ऑफ रॅली क्रॉस आणि कप ऑफ पोलंडमध्ये सहभाग घेतला. दोन्ही रेसमध्ये त्याने अपेक्षेपेक्षा चांगले प्रदर्शन केले. पोलंडमध्ये तर तो आपल्या गटात सर्वात पुढे होता. यानंतर आणखी कठीण आव्हान स्वीकारून तो ड्रिफ्टिंग रेसर बनला. या रेसमध्ये वारंवार गिअर बदलण्याची गरज नसते. तो डाव्या पायाने स्टिअरिंग सांभाळतो, तर उजव्या पायाने पॅडल्सवर नियंत्रण ठेवतो.
पुढाल स्लाइड्सवर पाहा, त्याचे कार चालवतांनाचे खास Photos
बातम्या आणखी आहेत...