आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संडे सेलिब्रिटी - मिलोस : बालपणी आळशी; डिनरला लागतात अडीच तास!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज आपल्या भेटीला येत आहे कॅनडाचा टेनिस स्टार मिलोस राओनिक. विम्बल्डनच्या सेमीफायनलमध्ये रॉजर फेडररला हरवल्यानंतर जगातला नंबर सातचा खेळाडू राओनिक चर्चेत आला. कोणत्याही ग्रँडस्लॅमच्या फायनलमध्ये प्रवेश करणारा तो कॅनडाचा पहिला पुरुष खेळाडू ठरला आहे.

कॅनडाचा २५ वर्षीय मिलोस राओनिकला जर टेनिसचा ‘न्यू स्टार’ किंवा ‘पार्ट ऑफ न्यू जनरेशन’ म्हटले तर ते चूक ठरू नये. सर्बियामध्ये (युगोस्लाव्हिया) २७ डिसेंबर १९९० रोजी जन्मलेल्या राओनिकचे कुटुंब नंतर कॅनडात स्थलांतरित झाले. त्या वेळी तो अवघ्या ३ वर्षांचा होता.
राओनिकला त्या वेळेसचे काहीच आठवत नाही. ४ वर्षांचा असताना एकदा मधमाशीने डंख मारला होता, एवढेच त्याला आठवते. तो ९ वर्षांचा असताना त्याला वडिलांनी टेनिसचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. त्या वेळी कोर्टवर जाऊन प्रशिक्षण घेण्यासाठी त्यांच्याकडे पुरेसे पैसे नव्हते म्हणून त्याचे वडील बॉल मशीनने ट्रेनिंग देत होते. वडील सकाळी त्याला सरावाला घेऊन जात असत. राओनिक फाळ आळशी होता. बाॅल मशीनने सरावानंतर तो चेंडू उचलायलासुद्धा जात नसे. मात्र, वयाच्या नवव्या वर्षी सुरू झालेला टेनिसचा प्रवास वाढत गेला. तू टेनिस का खेळतो, असे त्याला विचारण्यात आले तेव्हा राओनिक म्हणतो, “मी सलगपणे टेनिस खेळू शकतो. कारण हे वैयक्तिक गेम असून टीम गेम नाही. यात विजय-पराभवासाठी केवळ आपणच जबाबदार असतो.’ राओनिकचे आई-वडील इंजिनिअर होते. तो बहीण जेलेनापेक्षा ११, तर भाऊ मोमिरशी ९ वर्षांनी लहान आहे. इतका लहान असल्यामुळे बहीण त्याची खूप काळजी घेत असे. ती खेळाशिवाय त्याच्या लूकवरही आपला सल्ला देत असे. बालपणी खेळून आल्यानंतर जेलेना त्याला नीटनेटके तयार होण्यास सांगत असे. आपण जेव्हा चांगले दिसतो, तेव्हा आपला आत्मविश्वास वाढतो आणि प्रदर्शनात सुधारणा होते, असे जेलेना सांगायची. राओनिक म्हणतो, “जेलेनामुळे मी फॅशन आणि स्टाइलबाबत जागृत आहे. कोर्टवर खेळाशिवाय मी लूकवरही लक्ष देतो. कोणत्या ग्रँडस्लॅममध्ये काय घालायचे आहे, हे मी कधी कधी जेलेनाला विचारतो.’ राओनिकला मोबाइल फोनची सवय आहे. तो आपली आवडती बास्केटबॉल टीम टोरंटो रॅप्टर्सचा सामना मोबाइलवरच पाहतो. राओनिकची आणखी एक सवय आहे. तो डिनर करण्यासाठी दोन ते अडीच तासांचा वेळ घेतो. याचे कारण तो सांगतो, “हा माझा खासगी वेळ असतो. मी या वेळेत पूर्ण रिलॅक्स असतो. मी चर्चा करत डिनर करतो. यामुळे जास्त वेळ लागतो.’ राओनिक माजी अमेरिकन स्टार पीट सॅम्प्रासचा फॅन आहे. त्याच्याकडे सॅम्प्रासच्या सर्व सामन्यांचे व्हिडिओ आहेत. टोरंटोत एका प्रदर्शनीय सामन्यात त्याने सॅम्प्रासला हरवलेसुद्धा आहे. राओनिकने २०११ मध्ये आपले फाउंडेशन स्थापन केले. त्याची संस्था गरजू लहान मुलांसाठी खेळ आणि शिक्षणासाठी काम करते. सोबतच तो चॅरिटी सामन्याचेही आयोजन करतो.
रेकॉर्ड
> एटीपी न्यूकमर ऑफ द इयर २०११.
> सलग पाच वेळा कॅनडा मेल प्लेअर ऑफ द इयरचा विक्रम केला आहे
> टोरंटो स्पोर्ट््स हॉल ऑफ ऑनर मेल अॅथलिट ऑफ द इयर अमेरिकन रेकॉर्ड््स
अवाॅर्ड
> ९० च्या दशकात जन्मलेला एटीपी टूर जिंकणारा पहिला खेळाडू.
> ऑस्ट्रेलियन ओपन सेमी, फ्रेंच ओपन क्वार्टर, विम्बल्डनच्या फायनलमध्ये पोहोचणारा कॅनडाचा पहिला खेळाडू.

संपत्ती : जवळपास ४० कोटी रुपये

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...