आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वडील चॅम्पियन बनल्याच्या चार दिवसांनी निकोचा जन्म

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज आपल्या भेटीला येत आहे मर्सिडीझ एफ वन टीमचा जर्मन ड्रायव्हर निको रोसबर्ग. या सत्रातील पहिली रेस ऑस्ट्रेलियन ग्रांप्री जिंकून रोसबर्ग चर्चेत आला आहे. आता त्याचे लक्ष बहरीन ग्रांप्री फॉर्म्युला वन रेस जिंकण्यावर आहे.
निकाे राेसबर्गचे वडील केके रोसबर्ग माजी फॉर्म्युला वन चॅम्पियन होते. अर्थात, त्याला रेसिंगचे बाळकडू वडिलांकडून मिळाले. ही प्रतिभा वडिलांकडून त्याच्यात आली. त्याची एफवन रेसर हाेण्याची इच्छा हाेती. त्यासाठी त्याने प्रयत्नदेखील केले. १९८५ मध्ये ज्या दिवशी रोसबर्गचा जन्म झाला, त्याच्या चार दिवस अाधी त्याचे वडील डेट्रोइट ग्रांप्रीचे चॅम्पियन ठरले होते. वडील चॅम्पियन बनताच चार दिवसांनी आणखी एका चॅम्पियनने जन्म घेतला.

जर्मनीत जन्मलेला रोसबर्ग युवा होईपर्यंत मोनाको येथे आपल्या कुटुंबासमवेत राहत होता. यामुळे त्याच्याकडे जर्मनी आणि फिनलंड या दोन्ही देशांचे नागरिकत्व आहे. मात्र, एफ-वनमध्ये तो जर्मनीकडूनच खेळतो. त्याचे वडील फिनलंडकडून एफवन स्पर्धेत सहभागी हाेत हाेते. राेसबर्गला एफवनशिवाय फुटबाॅल, बुद्धिबळसारख्या खेळांचीदेखील अावड हाेती.

‘बाळाचे पाय पाळण्यात दिसतात’ या म्हणीनुसार केके रोसबर्ग यांना आपल्या मुलाची रेसिंगमधील प्रतिभा बालपणीच दिसू लागली. निकोने वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षी कार्टिंग करण्यास सुरुवात केली. आता त्याच्या संघाचा सहकारी लुईस हॅमिल्टनसुद्धा कार्टिंगमध्ये त्याच्यासोबत होता. या दोघांतील स्पर्धा तेव्हापासून सुरू झाली. यानंतर २००० मध्ये त्याने जर्मन फॉर्म्युला बीएमडबल्यू चॅम्पियनशिप जिंकली. येथूनच त्याच्या कारकीर्दीला सुरुवात झाली. यानंतर त्याने आपल्या वडिलांच्या संघाकडून फॉर्म्युला-३ सिरीजमध्ये सहभाग घेतला. यादरम्यान निकोने एरॉनॉटिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण लंडनच्या इम्पिरियल कॉलेजमधून पूर्ण केले. त्याने २००६ मध्ये पहिल्यांदा विल्यम्स संघाकडून फॉर्म्युला वनमध्ये सहभाग घेतला. बहरीन ग्रांप्रीमध्ये सर्वात वेगाने लॅॅप पूर्ण करणारा तो युवा ड्रायव्हर ठरला. यानंतर त्याने अनेक मोठे यश मिळवले. तो २०१० पासून मर्सिडीझ संघाशी जुळाला. तो आतापर्यंत याच टीमसोबत आहे. राेसबर्गने २०१४ मध्ये अापली लहानपणीची मैत्रीण व्हिव्हियन सिबाेल्डशी लग्न केले. त्यानंतर त्याने अापल्या कारचाही नंबर बदलून टाकला. अाता त्याच्या कारचा युनिक क्रमांक हा असा अाहे. त्यामुळे अाता करिअरच्या शेवटपर्यंत त्याच्या कारचा हाच क्रमांक कायम राहील. कारण हाच क्रमांक त्याच्या अाई अाणि वडिलांच्या अावडीचा अाहे. त्याने अापल्या हेल्मेटचा रंगदेखील बदलून टाकला अाहे. ताे सुरुवातीला पिवळ्या रंगाचे हेल्मेट वापरत हाेता. अाता ताे डार्क ग्रे रंगाचे हेल्मेट वापरणार अाहे.

दुसरीकडे रविवारी सत्रातील दुसऱ्या हाेणाऱ्या बहरीन ग्रांप्री रेससाठी निकाे राेसबर्गने कंबर कसली अाहे. हे दाेघेही सराव रेसमध्ये अव्वल ठरले अाहेत. त्यामुळे त्याच्या टीमचा सहकारी रेसर गत चॅम्पियन लुइस हॅमिल्टनच्या विजयाच्या अाशा धुळीस मिळण्याची शक्यता अाहे. राेसबर्गने यंदाच्या सत्रात हॅमिल्टनला तगडे अाव्हान देण्याची तयारी केली अाहे. हॅमिल्टन तीन वेळचा वर्ल्ड चॅम्पियन अाहे, तर राेसबर्ग हा दाेन वेळचा उपविजेता अाहे. त्यामुळे अाता टीमला हॅमिल्टनपेक्षाही राेसबर्गकडून किताबाचा विश्वास अाहे.