आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संघर्षाच्या काळात मायकेल फेल्प्सच्या मनात आला होता आात्महत्येचा विचार!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन- अमेरिकेचा अव्वल जलतरणपटू मायकेल फेल्प्सला अाॅलिम्पिकचा स्टार म्हणून सर्वत्र अाेळखले जाते. याचा अर्थ ताे सर्वच गाेष्टीत परिपूर्ण असल्याचे मानले जात नाही. त्याच्या अायुष्यालाही दुःखाची किनार लाभलेली अाहे. त्याचेही जीवन हे निराशा अाणि सुुखदु:खांनी भरलेले अाहे.

अाॅलिम्पिकमध्ये १८ सुवर्णांसह एकूण २२ पदकांची नाेंद अापल्या नावे करणाऱ्या मायकेल फेल्प्सनेही एकेकाळी अापल्या अायुष्यात माेठा संघर्ष केला. या संघर्षाच्या काळात अात्महत्येचा विचार त्याच्याही मनात येऊन गेला हाेता. मात्र, यातून ताे पूर्णपणे सावरला.

अमेरिकेच्या ३० वर्षीय मायकेल फेल्प्सने अापल्या जीवनातील कठीण काळातील अाठवणींना उजाळा दिला. ‘गत २००४ मध्ये मद्यप्राशन करून गाडी चालवल्याने मला पहिल्यांदा अटक करण्यात अाली हाेती. त्यानंतर १० वर्षांनी सप्टेंबर २०१४ मध्ये पुन्हा असाच गुन्हा माझ्या हातून घडला. या घटनेनंतर अमेरिकन जलतरण संघटनेने माझ्यावर सहा महिन्यांच्या बंदीची कारवाई केली. तसेच मला रशियालाही जाऊ दिले नाही. या ठिकाणी जागतिक जलतरण चॅम्पियनशिप हाेती. त्यानंतर मला दीड महिन्यासाठी रिहेब सेंटरमध्ये पाठवण्यात अाले. यामुळे मी फार निराश झालाे हाेताे. माेठा संघर्ष मला करावा लागत हाेता. याचदरम्यान मनात अात्महत्या करण्याचा विचार येऊन गेला. साथ देणारे असे काेणीही नाही, असेच मला सारखे वाटत हाेते. कुटुंबीयदेखील कामात व्यस्त हाेते,’ असेही मायकेल फेल्प्सने सांगितले.

लंडन अाॅलिम्पिकनंतर (२०१२) त्याने निवृत्ती घेतली : ‘याकृत्यामुळे माझे चुकले हाेते. माझ्या कुटुंबीयांनी बऱ्याच वेळा समुपदेशनही केले. त्यांनी मला मानसिक अाधार दिला. त्यामुळे रिआे अाॅलिम्पिकपर्यंत काेणत्याही प्रकारचे मद्यप्राशन करणार नाही, असा निर्धारच मी केला अाहे. अाता मी प्रामाणिकपणे अागामी स्पर्धेची तयारी करणार अाहे. त्यासाठी प्रचंड मेहनत घेण्याची माझी तयारी अाहे. अाता मी नित्यनेमाने सरावावर लक्ष केंद्रित केले अाहे. मद्यप्राशन केल्याने वेळापत्रकच काेलमडून जात हाेते,’ असे त्याने सांगितले.
बातम्या आणखी आहेत...