आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वोज्नियाकी आता खुश; चाहत्यांना शोध कारणाचा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘मी या मॅगझिनवर आल्याने खूप आनंदी आहे. मला अभिमान वाटत आहे. खूप कमी महिलांना स्विम सूट घालण्यास सांगितले जाते. मी त्या सुंदर आणि सशक्त महिलांपैकी एक आहे ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे,' हे उद‌‌्गार माजी नंबर वन महिला टेनिसपटू कॅरोलिन
वोज्नियाकीचे आहेत.

नॉर्थ आयरिश स्टार गोल्फर रॉरी मॅक्लारॉयशी दोन वर्षांपूर्वी झालेल्या ब्रेकअपनंतर निराशेत सापडलेली वोज्नियाकी बहुदा पहिल्यांदाच अानंदित दिसत आहे असे तिच्या शब्दांवरून दिसते. डेन्मार्कची टेनिस स्टार कॅरोलिन वोज्नियाकीने नुकतीच स्पोर्ट््स इलस्ट्रेटेड मॅगझिनच्या स्विम सूट आवृत्तीसाठी आपले शरीर रंगवले होते. वोज्नियाकीच्या आनंदाचा अंदाज यावरून येऊ शकतो की तिने इन्स्टाग्रामवरसुद्धा या फोटोला पोस्ट केले आहे. सोबत ती म्हणाली, "या फोटोशूटचा उद्देश स्वस्थ आणि वेगवेगळ्या शरीररचनेला दाखवणे होता. मी त्यापैकी एक आहे.' टेनिस संुदरी वोज्नियाकीशिवाय या मॅगझिनच्या कव्हरपेजसाठी टायगर वुड्सची माजी प्रेयसी आणि ऑलिम्पिक स्की चॅम्पियन लिंडसे वॉन आणि मार्शल आर्ट खेळाडू रोंडा राॅऊसी यांनीसुद्धा शरीर रंगवले आहे. तिकडे निराशेला मागे सोडणाऱ्या टेनिस स्टार वोज्नियाकीच्या आनंदाचे कारण शोधण्यात चाहते बिझी आहेत. अमेरिकन प्रोफेशनल बास्केटबॉल खेळाडू डेव्हिड लीसोबत तिची वाढणारी जवळीकता हे तर कारण नाही ना ?.. डेव्हिड ली हाच तिचा वास्तविक प्रेमी आहे, असे वोज्नियाकीने अद्याप कबूल केलेले नाही. चर्चा तर अशी आहे की मॅक्लारॉयशी संबंध तुटल्यानंतर वर्षभराने डेव्हिड ली वोज्नियाकीच्या आयुष्यात आला आहे. या जोडप्याला मिलान येथे नुकत्याच आयोजित एका कार्यक्रमात एकत्रित पाहण्यात आले होते. एका न्यूज पोर्टलने दिलेल्या माहितीनुसार त्या दोघांनी एकमेकांना फारसे न समजून घेता फोटोसाठी वेगवेगळ्या पोझ दिल्या. मॅक्लारॉयशी ब्रेकअपनंतर अनेक दिग्गज स्पोर्ट््स पर्सनॅलिटीजने या २५ वर्षीय टेनिस स्टारसोबत जवळीकता साधण्यात रुची दाखवली होती. स्टार रग्बी खेळाडू शॉन जॉन्सनने वोज्नियाकीला इन्स्टाग्रामवर फॉलो केले होते. मात्र, त्याला तिथे खास प्रतिसाद मिळला नाही. सोशल मीडियावर मला फॉलो करण्यासाठी तुम्ही वोज्नियाकीला सांगा, अशी विनवणी त्याने त्याची मुलाखत घेणाऱ्याला केली होती. वोज्नियाकीने त्याला टेनिस शैलीत उत्तर दिले, "अच्छा, तर तो माझा इन्स्टाग्रामवर पाठलाग करीत आहे. खरे तर त्याने यासाठी मला विचारायला हवे होते.'
डेव्हिड लीशी जवळीकता
बक्षिसांची रक्कम
२०,७१७,४२० डॉलर (१४२ काेटी ३८ लाख)
करिअर रेकाॅर्ड
४७८-१९४
{अातापर्यंत ग्रँडस्लॅम किताबापासून दूर