आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉम्बस्फोटात वाचली, मिळाले जगण्याचे बळ, मेलिसाला बनायचे होते जिम्नॅस्ट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मिशिगन (अमेरिका)- "जीवन खूप छोटे आहे. तुम्हाला जे काही करायचे आहे, ते आताच करून टाका. कधीही पुढच्या दिवसाची वाट बघू नका,' असे प्रेरक उद्गार अमेरिकन पॅराट्राय अॅथलिट मेलिसा स्टॉकवेल हिचे आहेत. ती नेहमी सकारात्मक असते आणि लोकांना असेच करण्यास प्रेरित करत असते. कधीही घाबरू नका. नेहमी नवे काही करण्यास तयार राहा, असे ती म्हणते.
मेलिसाचे आयुष्य अत्यंत रोमांचक असेच आहे. ती छोटी होती तेव्हा तिला जिम्नॅस्ट बनून आपल्या देशासाठी ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण जिंकायचे होते. याशिवाय आर्मीत भरती होऊन देशाची सेवा करण्याचेही तिचे स्वप्न होते. तिने अमेरिकन सेनेत सेकंड लेफ्टनंट म्हणून कामास सुरुवात केली होती. मार्च २००४ मध्ये इराक बेसकॅम्पजवळ एका बॉम्बस्फोटात तिने आपला एक पाय गमावला. यानंतर ती निराशेच्या गर्तेत सापडली. सर्वकाही अंधकारमय दिसू लागले. मात्र, स्फोटानंतरही आपला जीव वाचल्याची जाणीव तिला काही िदवसांनी झाली. प्राण वाचले, यापेक्षा चांगले काही असू शकत नाही. या गोष्टीने तिला सकारात्मकता दिली. पाय गमावल्यानंतर ५२ दिवसांनी तिने कृत्रिम पाय लावला. आधी लोकांवर अवलंबून असलेली मेलिसा आता आत्मनिर्भर झाली. बालपणी जिम्नॅस्ट होण्याचे स्वप्न बघणाऱ्या मेलिसाने पुन्हा खेळाला जवळ करण्याचे ठरवले. यानंतर तिच्यासारख्या अपंग लोकांना खेळात पुढे येण्यास मदत करणाऱ्या संस्थांसोबत ती जुळली. तिने मॅरेथॉन, जलतरण, सायकलिंग सुरू केले. बीजिंग ऑलिम्पिकमध्ये तिचे ऑलिम्पिक सहभागाचे स्वप्न पूर्ण झाले. अमेरिकन संघात तिची निवड झाली.