आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संडे सेलिब्रिटी: ब्राझिलियन पॉप म्युझिकला प्रमोट करतो स्टार नेमार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज आपल्या भेटीला येत आहे बार्सिलोनाचा स्टार ब्राझिलियन फुटबॉलपटू नेमार. नेमार आयकर चोरीप्रकरणी चर्चेत आहे.

मैदानावरील तुफानी वेग, वेगवान ड्रिबलिंग आणि शानदार फिनिशिंगचे दुसरे नाव नेमार आहे. तो डाव्या अाणि उजव्या दोन्ही पायांनी परफेक्ट शॉट मारू शकतो. वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी तो ब्राझीलच्या टॉप-५ गोल स्कोअररमध्ये सामील झाला. खेळाशिवाय त्याचा संगीतात रस आहे. तो ब्राझिलियन म्युझिकचा आयकाॅन आहे. तो ब्राझीलच्या आधुनिक पॉप म्युझिकला प्रमोट करतो. गोल केल्यानंतर डान्स करून जल्लोष करताना तो अनेकदा दिसला. त्याने २०१२ मध्ये लुकास आणि मार्सेलो व्हिडिओत केमियो अपिरियन्स केले. २०१३ मध्ये त्याने कॉन्फेडरेशन चषकात गोल्डन बॉलचा पुरस्कार पटकावला होता. अनेक जण त्याला रोनाल्डो, मेसीपेक्षा सरस मानतात.
नेमार वयाच्या १८ व्या वर्षी २०१० मध्ये राष्ट्रीय संघात निवडला गेला. पुढच्या वर्षी त्याला कन्यारत्न झाले. सुरुवातीला त्याने आपली मुलगी डॅवी लुकाच्या आईचे (कॅरोलिना दांतास) नाव सांगितले नाही. यामुळे बाळ आणि आईच्या खासगी जीवनावर परिणाम होईल, असे त्याने सांगितले होते. नेमार आणि कॅरोलिन आता वेगवेगळे राहतात. नेमारला "बेस्ट टीममॅन' म्हटले जाते. सेंटर फॉरवर्ड असताना तो नेहमी संघातील सहकाऱ्यांना गोल करण्यासाठी मदत करतो. त्याने ब्राझीलसाठी ६९ सामन्यांत ४६ गोल केले आहेत. महान फुटबॉलपटू पेेले ७७ गोलसह अव्वलस्थानी आहे.
त्याची वार्षिक कमाई जवळपास ३३४ लाख डॉलर (२२५ कोटी रु.) अाहे. तो कमी वयात सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंत दुसऱ्या स्थानी आहे. तो चॅरिटीतसुद्धा सक्रिय असतो. नेमार आपल्या कमाईतील १० टक्के चर्च आणि आपले धार्मिक गुरू काका यांना देतो. तो चॅरिटीसाठी एक कार्यक्रमही घेतो. यातून होणारी कमाई तो गरीब मुलांवर खर्च करतो.
नेमार टाइम मॅक्झिनच्या (फेब्रुवारी २०१३) कव्हर पेजवर येणारा पहिला ब्राझीलचा खेळाडू ठरला. खेळण्याची पद्धत बघून अनेक जण त्याला पुढचा पेले म्हणतात. २०१२, २०१३ मध्ये स्पोर्ट््सप्रो मॅक्झिनने त्याला मोस्ट मार्केटेल अॅथलिट म्हणून निवडले. त्याने या शर्यतीत युसेन बोल्ट, क्रिस्टियानो रोनाल्डो, लियोनेल मेसी, रॉरी मॅक्लारॉयला मागे टाकले.
बातम्या आणखी आहेत...