आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रणनीतीने मिडफील्ड प्रबळ, भारतीय हॉकी संघाचा कर्णधार सरदारा सिंगची माहिती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिल्ली - भारतीय हाॅकी संघ नव्या रणनीतीनुसार सराव करीत असल्यामुळे मिडफील्डला त्यामुळे सर्वाधिक सहकार्य मिळेल आणि संघाची क्षमताही वाढेल, अशी माहिती देत आगामी एफआयएच हाॅकी वल्ड लीग उपांत्य फेरीपूर्वी भारतीय हाॅकीपटूंचे मनोधैर्य वाढवण्याचा संघनायक सरदारा सिंगने प्रयत्न केला आहे.

अ गटात भारताला मातब्बर आॅस्ट्रेलिया, पाकिस्तान, फ्रान्स आणि पोलंड या संघांसोबत स्थान मिळाल्यामुळे साखळी फेरीत आम्ही अव्वल दोन स्थानांपैकी एक बळकावण्याचा प्रयत्न करू. आम्ही सध्या खेळण्याचा वेग वाढवण्यावरही परिश्रम घेत आहोत. यामुळे आम्हाला अन्य संघांविरुद्ध खेळताना कोणतीही अडचण जाणवणार नाही, त्याचप्रमाणे एन मोक्याच्या क्षणी मिळणारे लांब अंतराचे पासही वाया जाणार नाहीत. खेळाडूंचा कसून सराव फायद्याचा ठरेल, असेही सरदारा म्हणाला.