आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हॉकीत आक्रमण मजबूत करण्यावर भर : उथप्पा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिल्ली- न्यूझीलंडविरुद्धच्या नोव्हेंबर-डिसेंबरमधील देशातील हॉकी कसोटी मालीकेत भारतीय संघ आक्रमण फळी आणखी मजबूत करण्यावर भर देणार असल्याची माहिती मिडफिल्डर एस.के.उथप्पाने दिली आहे.

नोव्हेंबर महिन्यातील हॉकी वर्ल्ड लीगची तयारी म्हणून आम्ही या कसोटी मालिकेचा पूरेपूर वापर करून घेऊ. त्यामुळे या मालिकेत उत्तम कामगिरी करून ताळमेळ, आक्रमण, पेनल्टी कॉर्नर आणि अन्य काही आघाड्यांवर सुधारणा करण्याचा आम्ही पूर्णपणे प्रयत्न करणार आहोत. २ ते ११ ऑक्टोबर या कालावधीत आम्हाला न्यूझीलंडविरुद्ध स्वत:च्या क्षमतेचेही परीक्षण करता येईल. कारण डिसेंबरमध्ये हिरो हॉकी वल्ड लीगचे रायपूर येथे आयोजन करण्यात आले असून या लीगमधील संघाच्या कामगिरीचा परिणाम हा पुढच्या वर्षी होणाऱ्या ऑलंपीकपर्यंत कायम राहू शकतो, असा आशावादही उथप्पाने व्यक्त केला.