आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुमेधकुमार देवने जिंकले राैप्यपदक, अायएसएसएफ ज्यु. चषक नेमबाजी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुहल - अाैरंगाबादचा गुणवंत युवा खेळाडू सुमेधकुमार देवने साेमवारी अायएसएसएफ ज्युनियर चषक नेमबाजी स्पर्धेत राैप्यपदकाची कमाई केली. त्याने ५० मीटर पिस्तूल प्रकारामध्ये हे यश संपादन केले. त्याने १८४.१ गुणांसह दुसऱ्या स्थानावर धडक मारली. साेनेरी यशासाठी प्रयत्नशील असलेल्या सुमेधचे अवघ्या ०.४ ने सुवर्णपदक हुकले. या गटात रशियाचा बासरीव हा सुवर्णपदकाचा मानकरी ठरला. जर्मनी येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत भारतीय नेमबाजी संघाने तिसऱ्या दिवशी एकूण तीन राैप्यपदके पटकावली.
अाैरंगाबादच्या सुमेधने अवघ्या दाेन अाठवड्यांत दुसऱ्यांदा राैप्यपदकावर नाव काेरले. यापूर्वी त्याने २५ व्या शूटिंग हाेप्य स्पर्धेत राैप्यपदक पटकावले हाेते.
पहिल्या दिवशी भारताला सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या शिवम शुक्लाने सांघिक गटात राैप्यपदक मिळवले. त्याने अचल प्रताप ग्रेवाल अाणि ऋषिराज बराेटसाेबत २५ मीटर रॅपिड फायर पिस्तूल प्रकारात पदकाची कमाई केली. या गटात रशियाच्या टीमने सुवर्णपदक पटकावले.
बातम्या आणखी आहेत...