आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उंची कमी असल्याने शाळेत होता थट्टेचा विषय, आज मिश्र मार्शल आर्टचा जगातील सर्वात मोठा स्टार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिकेचा दिग्गज बॉक्सिंगपटू फ्लाॅइड मेवेदरसोबत येत्या ऑगस्टमध्ये होणाऱ्या फाइटमुळे यूएफसी चॅम्पियन कोनोर मॅक्ग्रिगोर सध्या चर्चेत आहे. दोन वेगवेगळ्या वजन गटांत किताब जिंकणारा तो यूएफसीचा पहिला फायटर आहे. फायटिंगच्या आधी मॅक्ग्रिगोरने प्लंबर म्हणूनसुद्धा काम केले आहे.  
 
 
अल्टिमेट फायटिंग चॅम्पियनशिपच्या (यूएफसी) चाहत्यांमध्ये कोनोर मॅक्ग्रिगोर सर्वात लोकप्रिय नाव आहे. यूएफसीचे अध्यक्ष डाना व्हाइट यांच्या शब्दांत मॅक्ग्रिगोर मिश्र मार्शल आर्टसाठी वरदान ठरला आहे. त्याच्यामुळे या खेळाला जगभरात नवी ओळख मिळाली. मॅक्ग्रिगोर आता येत्या २६ ऑगस्ट रोजी आपल्या जीवनातील सर्वात मोठी फाइट लढणार आहे. १८० मिलियन डॉलरच्या (जवळपास ११५७ कोटी रु.) सामन्यात त्याच्यासमोर असेल बॉक्सिंगचा सर्वाधिक चर्चित खेळाडू फ्लॉइड मेवेदर. मेवेदरने बॉक्सिंगमधून निवृत्ती घेतली होती. फक्त मॅक्ग्रिगोरविरुद्ध सामन्यासाठी त्याने निवृत्तीतून पुनरागमन केले आहे.   
 
आज आपल्या मजबुतीसाठी जगभरात चर्चेत असलेल्या मॅक्ग्रिगोरचे जीवन नेहमीच असे नव्हते. आयर्लंडचे एक छोटे शहर क्रेमलिन येथे त्याचे बालपण गेले. कमी उंची असल्यामुळे त्याची शाळेत टिंगल उडवली जायची. यानंतर त्याने फायटर बनण्याचा निर्णय घेतला आणि जगात बोटावर मोजण्याइतके लोकच त्याचा सामना करू शकतात. सुरुवातीला ताे इतर आयरिश मुलांप्रमाणे फुटबॉलचा चाहता होता. मँचेस्टर युनायटेड त्याची आवडती टीम होती. बॉक्सिंगमध्ये येण्याआधी तो शाळेच्या फुटबॉल संघाचा सदस्य होता. उपजीविकेसाठी त्याने बरेच दिवस प्लंबर म्हणूनही काम केले. एकदा तर प्लंबर म्हणून सामाजिक सेवा मिश्र मार्शल आर्टची वाढती लोकप्रियता बघून तो बॉक्सिंग सोडून एमएमएमध्ये सामील झाला. एक वर्ष अमॅच्युअर रूपाने फाइट केल्यानंतर २००८ मध्ये तो प्रोफेशनल फायटर बनला. तेव्हापासून त्याने मागे वळून पाहिले नाही.   
 
कोनोर मॅक्ग्रिगाेर स्वत: गे नाही, मात्र गे लोकांचा तो समर्थक आहे. माझी टीम गे लग्नाची समर्थक आहे. कारण प्रत्येक व्यक्तीला समान हक्क आणि अधिकार आहेत, असे त्याने म्हटले आहे. मॅक्ग्रिगोर २००८ पासून डी डेवलिनसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. या वर्षी  ५ मे रोजी डेवलिनने मुलाला जन्म दिला. त्याचे नाव जॅक मॅक्ग्रिगोर ज्युनियर ठेवण्यात आले आहे. मॅक्ग्रिगोरवर दोन बहिणी एरिन आणि एयोफे यांची जबाबदारी आहे.   
 
मॅक्ग्रिगोर फाइटच्या आधी कसल्याच अंधश्रद्धेवर किंवा रिच्युअलवर विश्वास ठेवत नाही. असे करणे हे  भीतीचे संकेत आहेत, असे त्याचे मत आहे. एखाद्या सामन्यापूर्वी विरोधी खेळाडूला असे करताना कधी त्याने पाहिले तर तो आपला विजय नक्की आहे, असे समजतो. कारण त्याचा विरोधी खेळाडू आपली भीती जाहीर करत अाहे, असे त्याला वाटते. फायटिंगशिवाय बिनधास्त जीवनशैलीसाठीही मॅक्ग्रिगोरला ओळखले जाते. तो खूप खर्चिक आणि चॅरिटी काम करण्यात मागे नसतो. तो आपली १५ टक्के कमाई चॅरिटीसाठी दान करतो.  
 
विक्रम आणि आकडेवारी  
-२४ पैकी २१ सामने एमएमएचे  मॅक्ग्रिगोरने आतापर्यंत जिंकले. यातील १८ लढती त्याने प्रतिस्पर्धीला नाॅकआऊट करून जिंकल्या.   
- ७४ इंच पोहोच मॅक्ग्रिगोरची फाइटच्या 
वेळी असते, म्हणजे १८८ सेंमी.  
- २००८ पासून फायटिंग करणारा मॅक्ग्रिगोर दोन वेगवेगळ्या गटांत चॅम्पियन बनणारा पहिला यूएफसी फायटर आहे.  
- २००८ पासून तो प्रोफेशनल फायटर बनला. त्याच्याआधी १ वर्ष त्याने अमॅच्युअर फायटिंग केली होती.
बातम्या आणखी आहेत...