आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संडे सेलिब्रिटी अँडी मरे: शाळेवरील बॉम्बहल्ल्यामुळे विजयाची सवय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अाज आपल्या भेटीला येत आहे जगातला दुसऱ्या क्रमांकाचा टेनिसपटू अँडी मरे. कोच बदलल्यामुळे अँडी मरे सध्या चर्चेत आहे. त्याने अॅमिली मोरेस्मोला सोडून इवान लेंडल यांना आपला कोच म्हणून निवडले आहे. तो एगोन क्लासिकमध्ये सलग विजय मिळवत आहे.

आठ वर्षांचा असताना अँडी मरेच्या शाळेवर हल्ला झाला होता. यात शाळेतील १६ विद्यार्थी आणि एका शिक्षकाचा मृत्यू झाला होता. मरे हल्लेखोरांना ओळखत होता. हा हल्लेखोर त्यांचा स्काऊट लीडरच होता. मरे या ग्रुपमध्ये होता. मरेची आई जुडी मरे हिने चुकून या हल्लेखोराला आपल्या गाडीत लिफ्ट दिली होती. मरेने या घटनेचा उल्लेख आपल्या आत्मचरित्रात केला आहे. या घटनेला विसरण्याच्या प्रयत्न मरे अजूनही करतो आहे. मात्र, त्याच्या डोक्यातून ही घटना जातच नाही. या घटनेचा त्याच्यावर खोल परिणाम झाला. या घटनेनंतर त्याच्यामध्ये विजयाची सवय आणखी वाढली.
१५ मे १९८७ रोजी ग्लास्गो (स्कॉटलँड) येथे जन्मलेल्या मरेत टेनिस खेळण्याची इच्छा त्याच्या आईने जागवली. ती फेड संघाची कर्णधार होती. ती मरे आणि त्याचा भाऊ जॅमीला वयाच्या तिसऱ्या वर्षापासून कोर्टवर घेऊन जात होती. मरेने वयाच्या पाचव्या वर्षी पहिल्यांदा टेनिस स्पर्धेत सहभाग घेतला होता. मरेचे आजोबा (आईचे वडील) फुटबॉलपटू होते. यामुळे फुटबॉलमध्येसुद्धा त्याची रुची होती. त्याला फुटबॉलपटू व्हायचीही इच्छा होती. मात्र, वयाच्या १० व्या वर्षी तो टेनिसबाबत अत्यंत गंभीर झाला. या खेळात करिअर बनवण्याचा तो विचार करू लागला. मरे आणि सर्बियाचा नोवाक योकोविक बालपणापासून एकमेकांचे चांगले मित्र आहेत. दोघांनी पहिल्यांदा अकरा वर्षांचे असताना सोबत टेनिस खेळले होते. त्या वेळी दोघे ज्युनियर सर्किटमध्ये शानदार खेळाडू म्हणून अोळखले जात होते. २००५ मध्ये मरे डेव्हिस चषकात खेळणारा सर्वात युवा (१७ वर्षे) खेळाडू बनला. अँडी मरेने २००५ मध्ये माजी टेनिसपटू निगेल सियर्सची मुलगी किम सियर्ससोबत डेटला सुरुवात केली. दोघांनी २०१५ मध्ये लग्न केले. दोघांची सोफिया नावाची एक मुलगी आहे. मरेला रॅप संगीताची आवड आहे. मरे फावल्या वेळेत गोल्फ कार्टिंगही करतो. त्याला प्लेस्टेशन खेळणेही आवडते. २००४ मध्ये त्याची बीबीसी यंग स्पोर्ट््स पर्सनॅलिटी ऑफ इयर म्हणून निवड झाली. मात्र, दुर्दैवाने हॉटेलातील बाथरूममध्ये लॉक झाल्याने तो हा पुरस्कार घेण्यास जाऊ शकला नाही. हा पुरस्कार मिळवणारा तो एकमेव नॉन-इंग्लिश खेळाडू बनला. टेनिसमधील योगदानाबद्दल त्याला स्टर्लिंग विद्यापीठाकडून "फ्रीडम ऑफ स्टर्लिंग' आणि "डॉक्टरेट'ने सन्मानित करण्यात आले आहे. मरेने माजी ब्रिटिश फुटबॉलपटू डेव्हिड बेकहॅमसोबत २००९ मध्ये "मलेरिया नो मोअर युके' नावाचे कॅम्पेन सुरू केले होते. तो मलेरियाविरुद्ध लोकांत जनजागृती करतो. यासाठी निधीही गोळा करतो.

पुढील स्लाइडवर वाचा, मरेकडे किती आहे संपत्ती?

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)