आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sunil Chhetri, Jeje Lalpekhlua Power India To 7th SAFF Cup Title

फुटबॉल स्पर्धेत भारत सातव्यांदा चॅम्प; फायनलमध्ये अफगाणिस्तानचा पराभव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तिरुवनंतपुरम- यजमान भारतीय संघ रविवारी दक्षिण अाशियाई फेडरेशन फुटबाॅल स्पर्धेत सातव्यांदा चॅम्पियन ठरला. भारताने अापल्या घरच्या मैदानावर सातव्यांदा स्पर्धेच्या किताबावर नाव काेरले. यजमान भारताने फायनलमध्ये जागतिक क्रमवारीत १५० व्या स्थानावर असलेल्या अफगाणिस्तानचा पराभव केला. भारताने २-१ अशा फरकाने अंतिम सामन्यात राेमहर्षक विजयाची नाेंद केली.

कर्णधार सुनील छेत्री (१०१ मि.) अाणि जेजे लालपेखलुया (७२ मि.) यांनी केलेल्या गाेलच्या बळावर भारताने फायनलमध्ये विजय मिळवला. गत २०१३ च्या विजेत्या अफगाणिस्तान संघासाठी झुबेर अमिनने (७० मि.) एकमेव गाेल केला. मात्र, त्याला टीमचा पराभव टाळता अाला नाही. टीममधील इतर दिग्गज खेळाडू सपशेल अपयशी ठरले. त्यामुळे या टीमला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. अितरिक्त वेळेत रंगलेल्या या सामन्यात अफगाणच्या खेळाडूंनी शेवटपर्यंत सामन्यात गाेल करून बराेबरी मिळवण्यासाठी जाेरदार प्रयत्न केले. मात्र, त्यांना समाधानकारक अशी खेळी करता अाली नाही. टीमचा हुकमी एक्का खैबर हा सामन्यात पूर्णपणे अपयशी ठरला. त्याला एकही गाेल करता अाला नाही. परिणामी,
टीमला पराभवाचा सामना करावा लागला. अफणाणिस्तान संघाला त्याच्याकडून माेठी अाशा हाेती. त्याने स्पर्धेतील चारही विजयांत अफगाणकडून उल्लेखनीय कामगिरी केली. मात्र, फायनलमध्ये अपयशी ठरला. त्याच्या नावे स्पर्धेत सर्वाधिक चार गाेलची नाेंद अाहे.
कर्णधारपदाला साजेशी कामगिरी करताना सुनील छेत्रीने अतिरिक्त वेळेत फ्रि किकने गाेल करून भारताचा विजय निश्चित केला. दरम्यान, अफगाणिस्तान टीमकडून सामन्यात बराेबरी मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र, भारताच्या गाेलरक्षकाने पाहुण्या टीमचे अनेक प्रयत्न उधळून लावले. त्यामुळे अफगाणला पराभवाला सामाेरे जावे लागले.

भारताची अवघ्या २ मिनिटांत बराेबरी
पाहुण्या अफगाणिस्तान टीमने ७० व्या मिनिटाला सामन्यात १-० ने अाघाडी घेतली. मात्र, ही अाघाडी या टीमला फार काळ कायम ठेवता अाली नाही. त्यानंतर अवघ्या दाेन मिनिटांत जेजेने शानदार गाेल करून भारताला १-१ ने बराेबरी मिळवून दिली. त्यानंतर निर्धारित वेळेपर्यंत ही लढत १-१ ने बराेबरीत रंगली हाेती.

जेजे, सुनील छेत्रीची दुसऱ्या स्थानावर धडक
यजमान भारताचे सुनील छेत्री अाणि जेजे लालपेखलुया हे खेळाडू स्पर्धेत सर्वाधिक गाेलच्या यादीत दुसऱ्या स्थानावर राहिले. या दाेघांनीही स्पर्धेत आपल्या घरच्या मैदानावर प्रत्येकी ३ गाेल केले. त्यापाठोपाठ उपविजेत्या अफगाणिस्तानचा खैबर सर्वाधिक ४ गाेलसह अव्वल स्थानावर अाहे. तसेच अफगाणच्या फैसलनेही तीन गाेल केले अाहेत. यातूनच त्याला संयुक्तपणे दुसऱ्या स्थानावर धडक मारता अाली.