आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुपर सिरीज बॅडमिंटन: सायनासह के. श्रीकांत क्वार्टर फायनलमध्ये

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिडनी - भारतीय स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवाल आणि किदाम्बी श्रीकांत यांनी शानदार विजय मिळवताना ऑस्ट्रेलियन ओपन सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेच्या क्वार्टर फायनलमध्ये प्रवेेश केला. आता क्वार्टर फायनलमध्ये सायनाचा सामना थायलंडच्या रत्नाचोक इंतानोनशी होईल, तर श्रीकांतचा सामना क्वार्टर फायनलमध्ये द. कोरियाच्या क्वांग ही हियो याच्याशी असेल.

महिला गटात सातवी मानांकित सायनाने मलेशियाच्या जिन वेई गोहला ३७ मिनिटांत सहजपणे हरवले. सायनाने हा सामना २१-१२, २१-१४ असा जिंकला, तर बिगर मानांकित श्रीकांतने इंडोनेशियाच्या सोनी ड्वी कुनकोरोला ३४ मिनिटांत पराभूत केले. श्रीकांतने २१-१९, २१-१२ ने बाजी मारली.
सायनाचे शानदार प्रदर्शन : सायनाने वेई गोहविरुद्ध शानदार कामगिरी केली. सायनाने पहिल्या गेममध्ये ७-९ ने मागे पडल्यानंतरसुद्धा शानदार पुनरागमन करून सलग सहा गुण मिळवत स्कोअर १६-९ असा करीत आघाडी घेतली. यानंतर तिने पहिला गेम २१-१२ ने आपल्या नावे केला. यानंतर दुसऱ्या गेममध्ये सायनाने १३-९ ने आघाडी घेतल्यानंतर २१-१४ ने गेमसह हा सामना जिंकत क्वार्टर फायनल प्रवेश केला.
सायना ६-५ ने पुढे
सायना क्वार्टर फायनलमध्ये इंतानोनशी लढणार आहे. आपल्या करिअरमध्ये सायनाने इंतानोनला सहा वेळा पराभूत केले आहे, तर इंतानोनने सायनाला ५ वेळा हरवले. सायनाला या वर्षी उबेर चषकात इंतानोनकडून पराभूत झाली. हा हिशेब चुकता करण्याच्या इराद्यानेच सायना क्वार्टर फायनलमध्ये खेळेल.
श्रीकांतची कुनकोरोवर मात
पुरुष गटात जागतिक क्रमवारीत १३ व्या क्रमांकावर असलेल्या भारताच्या किदाम्बी श्रीकांतने २९ वा मानांकित इंडोनेशियाच्या कुनकोरोला हरवले. दोघांतील हा करिअरमध्ये पहिलाच सामना होता. श्रीकांतने सलग गेममध्ये विजय मिळवला.
समीर वर्माचा पराभव : समीर वर्माला इंडोनेशियाच्या अँथोनी गिटिंगने ५३ मिनिटांत संघर्षपूर्ण सामन्यात ११-२१, २१-७, २१-१९ ने मात दिली, तर तन्वी लाडला दुसऱ्या फेरीत चीनच्या वांग यिहानने २१-१८, २१-६ ने हरवले.
बातम्या आणखी आहेत...