आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Supergiant Vs. Kings XI Punjab, IPL Match 55 At Pune: Live Scores And Updates

RPS vs KXIP: पुण्याचा पंजाबवर 9 गडी राखून दणदणीत विजय, प्लेऑफसाठी पात्र

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - पुणे सुपरजायंट्सने पंजाबच्या अवघ्या 74 धावांचे लक्ष्य सहज पार करून प्लेऑफसाठी आपली जागा निश्चित केली आहे. पुण्याने केवळ 12 ओव्हरमध्येच पंजाबवर 9 गडी राखून विजय मिळवला. यात रहाणे याने 34 तर, राहुलने 28 धावा केल्या आहेत. या विजयासह पुणे सुपरजायंट्स या सीझनच्या आयपीएलमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा ठरला आहे.
 
तत्पूर्वी IPL-10 च्या व्या सामन्यात राइझिंग पुणे सुपरजायंट्स विरुद्ध प्रथम फलंदाजीवर उतरलेल्या किंग्स इलेव्हन पंजाबने दोनच षटक खेळून पहिली विकेट गमावली. तर, पाचव्या षटकात दुसरा गडी सुद्धा बाद झाला. पुण्याच्या तूफान गोलंदाजीने पंजाब 73 धावांवरच गुंडाळल्या गेला. 
 
पुणे सुपरजायंट्स दुसऱ्या क्रमांकाचा संघ
- हैदराबाद आपल्या शेटवच्या लीग सामन्यात गुजरातला पराभूत करून प्लेऑफमध्ये दाखल झाले आहे. हैदराबादच्या संघाकडे 17 पॉइंट्स आहेत. पुणे संघाला कुठल्याही परिस्थितीत हा सामना जिंकणे गरजेचे होते. पुण्याकडे सध्या 16 पॉइंट्स होते. मात्र, पंजाबच्या विजयानंतर आता समिकरणे बदलली आहेत.
- या सामन्यात पुण्याचा विजय झाला असून पुणे आता दुसऱ्या क्रमांकाचा संघ ठरला आहे. 
 
प्लेइंग इलेव्हन
किंग्स इलेव्हन पंजाब - मार्टिन गुप्टिल, इयॉन मॉर्गन, शॉन मार्श, ग्लेन मॅक्सवेल, रिद्धिमान साहा, अक्षर पटेल, राहुल तेवटिया, स्वप्निल सिंह, इशांत शर्मा, मोहित शर्मा आणि संदीप शर्मा.
 
राइजिंग पुणे सुपरजायंट्स - राहुल त्रिपाठी, अजिंक्य रहाणे, स्टीव्ह स्मिथ, मनोज तिवारी, एम.एस. धोनी, बेन स्टोक्स, डेन ख्रिश्चियन, वाशिंगटन सुंदर, शार्दुल ठाकूर, जयदेव उनादकट आणि अॅडम जम्पा.
बातम्या आणखी आहेत...