आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुरेश रैनाच्या नावावर IPL मध्ये दोन मोठे विक्रम, याबाबतीत कोहलीही पुढे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुजरात लायन्सचा कर्णधार सुरेश रैनाने आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक धावा काढण्याच्या यादीत अव्वल स्थानी आहे. - Divya Marathi
गुजरात लायन्सचा कर्णधार सुरेश रैनाने आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक धावा काढण्याच्या यादीत अव्वल स्थानी आहे.
स्पोर्ट्स डेस्क- गुजरात लायन्सचा कर्णधार सुरेश रैनाने आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक धावा काढण्याच्या यादीत अव्वल स्थान निश्चित केले आहे. रैनाची गुजरात लायन्स टीम आयपीएल-१० च्या प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर झाली आहे. मात्र, रैनाच्या नावे आयपीएलमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम कायम असेल. रैनाने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार विराट कोहलीला आयपीएलमध्ये सर्वाधिक धावांच्या यादीत मागे टाकले आहे. 
 
डावखुरा फलंदाज रैनाने आयपीएलमध्ये आतापर्यंत १५९ सामन्यांत ४५३२ धावा काढल्या आहेत, तर कोहलीच्या नावे १४८ सामन्यांत ४३६० धावा आहेत. मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा १५४ सामन्यांत ४१२४ धावांसह या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. कोलकाता नाइट रायडर्सचा कर्णधार गौतम गंभीर १४४ सामन्यांत ४०५९ धावांसह चौथ्या, सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर ११२ सामन्यांत ३९०८ धावांसह पाचव्या स्थानी आहे. रैना आणि कोहलीचे संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर झाले आहेत. गुजरातचे अजून सामने, तर बंगळुरूचा एक सामना शिल्लक आहे. 
 
रैनाच्या नावावर आणखी एक भन्नाट विक्रम-
 
- सुरैश रैना हा खरं तर टी-२० फॉर्मेटचा खेळाडू म्हणून ओळखला जातो. भारताकडून तो वन डे आणि टी-२० संघात बराच वर्षे राहिला पण कसोटीत त्याला स्थान मिळवता आले नाही.
- पण टी-२० फॉर्मेटमध्ये तो कमालीचा यशस्वी ठरला आहे. आताही आयपीएलसारख्या मोठ्या स्पर्धेत त्याच्या नावावर सर्वाधिक धावा आहेत.
- दुसरीकडे त्याने आयपीएलमध्ये एक अनोखा विक्रम केला आहे. २००८, २००९, २०१०, २०११, २०१२, २०१३, २०१४ आणि यंदा २०१७ मध्ये त्याने प्रत्येक सीजनमध्ये चारशेहून अधिक धावा काढल्या आहेत.
- असा पराक्रम करणारा तो एकमेव खेळाडू ठरला आहे.
 
पुढे स्लाईडद्वारे वाचा, सुरैश रैनाबाबत अधिक माहिती...
बातम्या आणखी आहेत...