आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO : शार्कच्‍या तावडीत सापडला स्‍पर्धक, अंगावर शहारे आणणारा व्‍हिडीओ झाला व्‍हायरल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जोहान्सबर्ग - दक्षिण आफ्रिकेच्या जोहान्सबर्गमधील समुद्रात सर्फिंग स्पर्धेदरम्यान आस्‍ट्रेलियाच्‍या सर्फर मिक फॅनिंग याच्‍यावर थेट दोन शार्कने प्राणघातक हल्‍ला केला. मात्र फॅनिंगने चक्‍क शार्कसोबत लढाई करून करून जीव वाचवला. या थरारक प्रसंगामुळे दर्शकांची चांगलीच घाबरगुंडी उडाली.
मिक फॅनिंगसोबत हा भयावह प्रसंग घडला तेव्‍हा त्‍याची आई स्‍पर्धा लाईव्‍ह पाहत होती. अंतिम सामना सुरू असताना शार्कने थेट त्‍याच्‍यावर हल्‍ला चढवला. या घटनेनंतर स्‍पर्धा तत्‍काळ थांबवण्‍यात आली.
शार्कला दिली जोरदार लाथ
तीन वेळा वर्ल्‍ड चॅम्‍पियन राहिलेल्‍या मिकने या घटनेनंतर सांगितले, 'मला माझ्या पायाजवळ काहीतरी विचित्र जाणवले. मग मला वाटलं पायात काहीतरी अडकले असेल. पण मला शार्क दिसला. मी त्‍यांला जोरदार पंच मारून निसटलो नि माझा जीव वाचवला.'
आईने पाहिले लाईव्‍ह
या स्‍पर्धेचे थेट प्रक्षेपण सुरू असल्‍याने मिकच्‍या आईनेही हा प्रसंग लाईव्‍ह पाहला. ती म्‍हणाली की, 'माझ्या कुटूंबियांसोबत घडलेला हा सर्वात भितीदायक प्रसंग होता.' त्‍यानंतर या प्रसंगातून सुखरूप बचावलेल्‍या मिकचे थाटात स्‍वागत करण्‍यात आले.
पुढील स्‍लाईडवर क्‍लिक करा, पाहा शार्कच्‍या हल्‍ल्‍याचा थरारक VIDEO शेवटच्‍या स्‍लाईडवर ..