आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुशीलची वर्ल्ड चॅम्पियनशिपमधून माघार, खांद्याच्या दुखापतीने त्रस्त

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भारताचा अव्वल कुस्तीपटू सुशील कुमारची अागामी २०१६ रियाे अाॅलिम्पिकमधील प्रवेशाची संधी हुकणार असल्याचे सध्या चित्र अाहे. दाेन वेळच्या अाॅलिम्पिक पदक विजेत्या सुशीलने अागामी वर्ल्ड चॅम्पियनशिपमधून माघार घेतली. खांद्याच्या गंभीर दुखापतीमुळे त्याने हा निर्णय घेतल्याची चर्चा अाहे. येत्या ७ सप्टेंबरपासून लास वेगास येथे जागतिक कुस्ती स्पर्धा हाेणार अाहे. या स्पर्धेतील उल्लेखनीय कामगिरीच्या बळावर सुशील कुमारला अागामी अाॅलिम्पिकचे तिकीट मिळवण्याची संधी हाेती.
लास वेगास येथील स्पर्धेसाठी भारतीय संघाची निवड येत्या साेमवारी हाेणार अाहे. यासाठी दाेनदिवसीय निवड चाचणीचे अायाेजन करण्यात अाले. यातून भारतीय कुस्ती संघाची निवड केली जाईल.
नरसिंग देणार ट्रायल!
भारताचा युवा कुस्तीपटू नरसिंग यादव हा जागतिक स्पर्धेसाठी अायाेजित निवड चाचणीमध्ये सहभागी हाेणार अाहे. त्याने या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्याचा निर्धार केला. सुशील कुमारनंतर भारतीय संघाची मदार नरसिंगवर असेल.
खांद्याच्या दुखापतीमुळे मी निवड चाचणीत सहभागी हाेऊ इच्छित नाही. त्यामुळे मला अागामी रिअाे अाॅलिम्पिकची पात्रता पूर्ण करण्यासाठीच्या जागतिक स्पर्धेतून माघार घ्यावी लागत अाहे. पूर्णपणे तंदुरुस्तीसाठी मी वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घेत अाहे.
सुशील कुमार, भारतीय ऑलिम्पिक रौप्यविजेता कुस्तीपटू.