आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

याेगेश्वर, सुशील सर्वात महागडे मल्ल, प्राे कुस्ती लीग १७ डिसेंबरपासून

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - येत्या १७ डिसेंबरपासून प्राे कुस्ती लीगला सुरुवात हाेत अाहे. यामध्ये अाॅलिम्पिक स्पर्धेतील पदक विजेते सुशील कुमार अाणि याेगेश्वर दत्त हे सर्वाधिक महागडे मल्ल ठरले. या वेळी याेगेश्वरवर ३९.७० लाख व सुशील कुमारवर ३८.२० लाखांची बाेली लागली.

या दाेन्ही खेळाडूंना अनुक्रमे हरियाणा व उत्तर प्रदेशच्या टीमने खरेदी केले. मंगळवारी पहिल्या सत्राच्या कुस्ती लीगसाठी झालेल्या बाेली प्रक्रियेमध्ये ५० मल्लांनी सहभाग घेतला हाेता. ही स्पर्धा भारतीय कुस्ती महासंघाच्या वतीने अायाेजित करण्यात येणार अाहे. सुशील कुमार अाणि याेगेश्वरची अाधारभूत किंमत ही प्रत्येकी ३३ लाखांची हाेती. त्यांची सहा अायकाॅन मल्लांमध्ये निवड करण्यात अाली हाेती. याच मल्लांमध्ये नरसिंग यादव, महिला कुस्तीपटू गीता फाेगट, अमेरिकेची मल्ल एडेलीन ग्रे अाणि स्वीडनची साेफिया मॅटसनही सहभागी अाहे.

नरसिंगला ३४.५० लाख
महाराष्ट्राच्या नरसिंग यादवला या लीगमध्ये ३४.५० लाखांची किंमत मिळाली अाहे. त्याला बंगळुरू टीमने खरेदी केले. तसेच महिला कुस्तीपटू गीता फाेगटला पंजाबच्या टीमने अाधारभूत किंमत ३३ लाखांमध्ये खरेदी केले अाहे. अमेरिकेच्या मल्लाला मुंबईने ३७ लाखांमध्ये विकत घेतले अाहे. याेगेश्वर अाणि नरसिंग हे दाेन्ही मल्ल ७४ किलाे वजन गटात नशीब अाजमावत अाहेत.
बातम्या आणखी आहेत...