आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंध खेळाडूने सामान्य खेळाडूंच्या स्पर्धेत सुवर्ण जिंकून केले प्रेरीत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- १५ वर्षांपूर्वी विदर्भ जलतरण स्पर्धेत कांचनमाला पांडेने सामान्य खेळाडूंना मागे टाकून चॅम्पियनशिप जिंकली. जन्मापासून अंध असलेल्या कांचनमालाने जिद्दीने यात सहभागी होण्याचे ठरवले होते. स्पर्धेच्या वेळी माझा मृत्यू झाला तरीही याला मीच जबाबदार असेल, असे तिने स्पर्धेच्या अायोजकांना सांगितले होते. त्या वेळी तिचे वय १० वर्षे होते.

कांचनमालाच्या जलतरणाचा प्रवास त्या दिवसापासून सुरू झाला. आतापर्यंत तिने अनेक आंतरराष्ट्रीय पॅरा जलतरण स्पर्धेत सहभागी होताना सुवर्णांसह पदके पटकावली आहे. मुंबईच्या संक रॉयपासून अरबी समुद्रात किमी जलतरण करणारी ती भारताची एकमेव पॅरा जलतरणपटू आहे. हे अंतर तिने एक तास १४ मिनिटांत पूर्ण केले. यामुळे तिचे नाव ‘लिम्का बुक ऑफ इंडियन रेकॉर्ड्‍समध्ये सामील करण्यात आले आहे. तिला एकलव्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. आता ती आपल्यासारख्या अपंग लोकांना आपली संघर्षाची कथा सांगून लढण्यासाठी प्रेरित करते.

कांचनमालाचे वडील ज्ञानेश्वर पांडे राष्ट्रीय हॉकीपटू होते. वडीलांप्रमाणे तिलासुद्धा खेळाडू व्हायचे होते. ती १० वर्षांची झाली तेव्हा तिने वडिलांना जलतरण शिकण्याची इच्छा व्यक्त केली. वडिलांनी तिला जलतरण तलावावर नेले. ती अंध असल्यामुळे कोचने तिला शिकवण्यास नकार दिला. मात्र, कांचनमाला निराश झाली नाही. तिने आठ दिवसांत स्वत:च्या बळावर जलतरण शिकले. ती रोज ते तास सराव करायची. यामुळे ती परफेक्ट झाली. २००१ मध्ये विदर्भ जलतरण चॅम्पियनशिपमध्ये तिने सामान्य खेळाडूंच्या गटात सहभागी होऊन सुवर्णपदक जिंकले. यानंतर तिने अनेक राज्य, राष्ट्रीय स्पर्धांत पदके मिळवली. २००६ मध्ये मलेशियात पॅरा आशियाई गेम्समध्ये चीनच्या जलतरणपटूला हरवत तिने सुवर्ण जिंकले. २००८ मध्ये जर्मनीत सुवर्णपदक जिंकले. यानंतर २०१२ मध्ये डेन्मार्कमध्ये झालेल्या पॅरा जलतरण स्पर्धेत तिने सुवर्ण आणि रौप्य मिळवले.

यामुळे ऑलिम्पिकची संधी हुकली
कांचनमाला नेबीजिंग पॅरालिम्पिक आणि लंडन पॅरालिम्पिकमध्येही क्वालिफाय केले होते. मात्र, केवळ एक कोटा असल्यामुळे तिला संधी मिळाली नाही. आता कांचनमाला इंडोनेशियात होणाऱ्या एशियन गेम्स आणि टोकियोतील ऑलिम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करण्याची तयारी करत आहे.
बातम्या आणखी आहेत...