आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नानंतर स्मिता काटवे यांनी केले मास्टर्स जलतरण स्पर्धेत पुनरागमन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- जिल्ह्यातील आघाडीच्या महिला जलतरणपटू स्मिता राजन काटवे यांनी लग्नानंतर २० वर्षांनी मास्टर्स जलतरण स्पर्धेत दमदार पुनरागमन केेले. आपल्या जबरदस्त कामगिरीने त्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेत ‘गोल्डन मेमरीज ऑफ इंडियन स्विमिंग’ या पुस्तकात आपले स्थान मिळवले.

साईचे निवृत्त प्रशिक्षक रमेश लाल यांनी लिहिलेल्या या पुस्तकाच्या पहिल्या आवृत्तीत देशभरातील अव्वल जलतरणपटूंच्या जीवनावर आणि खेळाच्या कामगिरीवर प्रकाश टाकण्यात आला आहे. पुस्तकात केवळ ६८ खेळाडूंना स्थान मिळाले. त्याचप्रमाणे भारतातील जलतरण खेळाच्या स्थितीचादेखील आढावा या पुस्तकात घेण्यात आला आहे. पुस्तकात काटवे यांच्या लहानपणापासूनची कामगिरी संक्षिप्त स्वरूपात देण्यात आली. त्यांनी केलेल्या विविध विक्रम राष्ट्रीय स्पर्धेतील यश ठळकपणे मांडण्यात आले अाहे.
१४व्या वर्षीच चमक दिसली : काटवेयांची जलतरणातील आवड आणि कठोर मेहनत लहानपणापासूनच दिसून येते होती. त्यांनी १४ व्या वर्षी धरमतल ते गेट वे ऑफ इंडिया हे अंतर ९.४० मि. पूर्ण करून सर्वांचे लक्ष वेधले होते. त्यांनी राज्य, राष्ट्रीय, शालेय आणि अखिल भारतीय आंतरविद्यापीठस्तरावर १०० पेक्षा अधिक अनेक पदके जिंकली आहेत. त्यांचे राजन यांच्याशी १९९० साली लग्न झाले आणि त्यानंतर कौटुंबिक जबाबदारी वाढल्याने त्या खेळापासून दूर गेल्या. त्यांच्यातील जलतरणपटू त्यांना शांत बसू देत नव्हता. अखेर २०१० मध्ये त्या पुन्हा जलतरणाकडे वळल्या आणि मास्टर्स स्पर्धेत त्यांनी चमकदार कामगिरी केली. त्या सध्या एमजीएमच्या जलतरणिकेत सराव करतात.
सागरीजलतरणात यश : काटवेयांनी सागरी जलतरणातदेखील उत्कृष्ट प्रदर्शन केेले आहे. त्यांनी जलतरण फेडरेशनतर्फे गोवा येथे घेण्यात आलेल्या सी सॅमेथॉन स्पर्धेत रौप्यपदक पटकावले होते. त्यांनी किमी सागरी जलतरण ५७ मिनिटांत पूर्ण करून उल्लेखनीय कामगिरी बजावली.

लिमका बुक इंडिया बुक रेकॉर्डमध्ये नोंद
काटवेयांनी स्वातंत्र्यदिनी १५ ऑगस्ट २०१४ रोजी एमजीएम जलतरणिकेत सलग १२ तास पोहण्याचा लिमका बुक ऑफ रेकॉर्ड इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड करत आपल्या कारकीर्दीत मानाचा तुरा खोवला. त्यांना महाराष्ट्र शासनाने २०१५ मध्ये स्वयंसिद्धा पुरस्काराने गौरवले.

बातम्या आणखी आहेत...