आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युरो कप फुटबॉल : स्वित्झर्लंड बाद फेरीत; फ्रान्ससोबत सामना ड्रॉ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लिली (फ्रान्स) - स्वित्झर्लंडने यजमान फ्रान्ससोबत गोलरहीत बरोबरी करून युरो कप फुटबॉल स्पर्धेच्या बाद फेरीत प्रवेश केला आहे. स्विस टीमने पहिल्यांदा युरोपियन चॅम्पियनशिपच्या प्री क्वार्टर फायनलमध्ये जागा मिळवली. अ गटातील इतर सामन्यात अल्बानियाने रोमानियाला १-० ने पराभूत करून बाद फेरीचे आव्हान कायम ठेवले आहे.

फ्रान्सची टीम दोन विजयांसह ७ गुण घेत आधीच प्री क्वार्टर फायनलमध्ये पोहोचली आहे. स्वित्झर्लंड पाच गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. अल्बानिया ३ गुणांसह तिसऱ्या तर रोमानिया एका गुणासह चौथ्या क्रमांकावर आहे. रोमानिया स्पर्धेबाहेर झाली आहे.
स्वित्झर्लंडविरुद्ध या सामन्यात फ्रान्सचा गोलकीपर हुगो लोरिसने डिडियर डिशेंप्सच्या ५४ वेळा संघाचे नेतृत्व करण्याच्या विक्रमाची बरोबरी केली. डिशेंप्स १९९८ मध्ये विश्वविजेत्या संघाचे नेतृत्व केले होते. मात्र, हुगो या सामन्यात संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. संघाने हातातील संधी गमावली, असे जुवेंट्सचा स्टार पोग्बानेसुद्धा कबूल केले.

या सामन्यात फ्रान्सने पाच बदल केले होते. आंद्रे पिएरे गिगनाकला स्ट्रायकर ऑलिव्हर गिराऊडच्या जागी स्वित्झर्लंडविरुद्ध खेळवले.
बातम्या आणखी आहेत...