आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिग बॅश क्रिकेट लीगमध्ये हरमनप्रीतच्या कामगिरीने सिडनी विजयी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अलबुरी - भारताची युवा अाॅलराउंडर हरमनप्रीत काैरने अष्टपैलू कामगिरीच्या बळावर अाॅस्ट्रेलियातील बिग बॅश क्रिकेट लीगमध्ये अापली छाप पाडली. तिच्या अष्टपैलू खेळीच्या बळावर सिडनी थंडर्सने मंगळवारी लीगमध्ये धडाकेबाज विजयाची नाेंद केली. तिने गाेलंदाजीसह फलंदाजीमध्येही (४ विकेट, नाबाद ३० धावा) सरस खेळी करून विजयात माेलाचे याेगदान दिले.

सिडनी थंडर्स संघाने सामन्यात मेलबर्न स्टार्सच्या महिला संघावर ८ गड्यांनी मात केली.
प्रथम फलंदाजी करताना मेलबर्न स्टार्स महिला संघाने निर्धारित २० षटकांत ९ बाद ११६ धावा काढल्या हाेत्या. प्रत्युत्तरात सिडनी थंडर्सने १८.५ षटकांत २ गड्यांच्या माेबदल्यात १२१ धावा काढल्या. सलामीवीर राचेल हायनेस (३५), स्टफिने टेलर (२९), कर्णधार अॅलेक्स ब्लॅकवेल (नाबाद २१) अाणि हरमनप्रीत काैरने (नाबाद ३०) सिडनीच्या विजयात माेलाचे याेगदान दिले. त्यामुळे सिडनीला झटपट विजयश्री खेचून अाणता अाली.

धावांचा पाठलाग करणाऱ्या हायनेस व टेलरने दमदार सुरुवात करून देताना संघाला अर्धशतकी भागीदारीची सलामी दिली. या दाेघांनी ५९ धावांची भागीदारी केली. दरम्यान, टेलर झेलबाद झाली. तिने ३८ चेंडूंत २ चाैकारांच्या अाधारे २९ धावा काढल्या.
हरमनप्रीत पदार्पणात चमकली
भारताची युवा खेळाडू हरमनप्रीत काैर लीगमधील पदार्पणात चमकली. तिने धारदार गाेलंदाजीसह तुफानी फलंदाजी केली. तिने ४ षटकांत २७ धावा देताना ४ गडी बाद केले. याशिवाय तिने नाबाद ३० धावांची खेळी केली.
बातम्या आणखी आहेत...