कीव (यूक्रेन)- चेर्नोबिलमध्ये 29 वर्षांपूर्वी न्यूक्लिअर घटनेने प्रचंड हैदोस घातला. या घटनेमुळे जीवसृष्टीवर खूप परिणाम झाला. त्यामुळे अनेक मुलं जन्मताच अपंग झाली. यातच तात्सियाना झिवत्सको हीसुद्धा होती. तात्सियानाचा जेव्हा जन्म झाला तेव्हा तिला पायचं नव्हते. त्यामुळे भविष्यात
आपल्या मुलीचे काय होईल, ती कशी जगेल असा प्रश्न तिच्या आई-वडिलांना होता. मात्र, आज तिनेच जगभरात आपल्या आई-वडिलांचे नाव उज्ज्वल केले. नुकत्याच झालेल्या बॉडी बिल्डिंगमध्ये तिने अवॉर्ड मिळवला आहे.
कोण आहे तात्सियाना?
- चेर्नोबिल येथील न्युक्लिअर घटनेच्या चार वर्षांनंतर बेलारूसमध्ये तात्सियानाचा जन्म झाला. तिच्या उजव्या हाताला एक आणि डाव्या हाताला केवळ तीन बोटे आहेत. हे पाहून तिला तिच्या पालकांनी अनाथाश्रमामध्ये सोडून दिले.
- 25 वर्षांच्या तात्सियानाला एका कुटुंबाने अनाथ आश्रमातून दत्तक घेतले.
- तात्सियानाने जगण्याचा निर्धार केला होता. तात्सियानाने तिच्या शारीरिक दुरबलतेला कधीही आड येउदिले नाही. ती लवकरच गुडघ्यावर चालायलाही लागली. नंतर तिला आर्टिफिशियल पाय लावण्यात आले. याच बरोबर सुरू झाला आयुश्याचा नवा प्रवास. यानंतर तिने रनिंगला सुरुवात केली आणि मॅरेथनमध्ये भाग घेतला.
चेर्नोबिलमध्ये काय झाले होते?
- 26 एप्रिल, 1986 ला यूक्रेनच्या न्यूक्लिअर प्लांटमध्ये जोरदार स्फोट झाला. यामुळे रेडिओ अॅक्टिव्ह पार्टिकल्स हवेत पसरले. रेडिएशन सोव्हियत रशीया पासून ते यूरोपपर्यंत पसरले. साधारणपणे 4 हजार लोक या घटनेत मारले गेले.
- साधारणपमे साडे तीन लाख लोकांना येथून निर्वासित व्हावे लागले. मात्र याचा दुष्परिणाम अद्यापही संपलेला नाही.
- रेडिएशनमुळे येथे आजही जन्माला येणारे लोक शारिरिक व्यग घेउनच जन्माला येतात.
- नुकताच चेर्नोबिल मुद्द्यावर लिहिणार्या बेलारूसच्या लेखिका स्वेतलाना अॅलेक्सेविच यांची साहित्यातील नोबेल पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा, तात्सियानाचे आश्चर्य चकित करणारे काही फोटोज..., तिने अशी केली आपंगत्वावर मात....!