आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षक बनली वर्ल्ड चॅॅम्पियन; आता रिओची तयारी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - गिल्डफोर्ड येथे रोज १० ते १२ तास सराव करून घाम गाळणाऱ्या कॅटी मॅक्लिनकडून इंग्लंडला आता सुवर्णाच्या आशा आहेत. तिच्या नेतृत्वात इंग्लंड रिओ ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण जिंकेल, अशी चाहत्यांना आशा आहे. मात्र, दोन वर्षांआधी मॅक्लिनने याबाबत विचारसुद्धा केला नव्हता. तेव्हा ती शाळेत शिकवत होती. शिक्षण म्हणून ती पूर्णवेळ कार्यरत होती. रग्बी ती छंद म्हणून आणि फिटनेससाठी आवश्यक म्हणून खेळत होती.

३० वर्षीय मॅक्लिन इंग्लंडच्या महिला रग्बी सेव्हन्स संघाची कर्णधार आहे. इंग्लंडने तिच्या नेतृत्वात २०१४ मध्ये वर्ल्डकप जिंकला होता. तेव्हापासून ते देशात शिक्षिकेपासून स्टार खेळाडू बनली. म्हणजे तिचे करिअर खूप छोटे, मात्र अत्यंत रोमांचक आहे. आपल्या तयारीबाबत ती म्हणते, "ज्याचा कधीही विचार केला नव्हता, ते मी करीत आहे. आम्ही १८ मुली ऑलिम्पिकची तयारी करीत आहोेत. ज्या वयात खेळाडू निवृत्ती घेतात, त्या वयात आम्हाला प्रोफेशनल काँट्रॅक्ट मिळाला. शाळेत मुलांना शिकवण्याचे सोडून आता मी मैदान आणि जिममध्ये तासन््तास मेहनत घेत आहे. ही जीवनशैली स्वीकारणे सुरुवातीचे तीन ते चार महिने खूप कठीण गेले. कधीकाळी ज्या खेळाला मी सोडले होते, त्या खेळात आज मी प्रोफेशनल खेळाडू आहे, यावर विश्वास बसत नाही.'

वयाच्या पाच वर्षांपासून रग्बी खेळण्यास सुरुवात करणारी मॅक्लिन म्हणते, मी वयाच्या ५ वर्षांपासून रग्बी खेळण्यास सुरुवात केली. मात्र, मी जेथे राहत होते, तेथे मुलींचा संघ नव्हता. यामुळे मी मिश्र संघात खेळत होते. १२ वर्षे पूर्ण झाल्यानंतर मला मुलांसोबत खेळण्यास रोखण्यात आले. कारण या वयानंतर मिश्र संघात खेळण्याची परवानगी नव्हती. यामुळे माझा खेळ सुटला. चार वर्षांनी दुसऱ्या शाळेत पोहोचले. तेथे रग्बी कोचने मला खेळण्यास सांगितले. मी पुन्हा खेळू लागले. नंतर लगेच लक्षात आले की मी केवळ छंद म्हणून खेळू शकते. कारण रग्बी संघटना महिला खेळाडूंशी करार करीत नाही. यानंतर मी शिक्षणाकडे अधिक लक्ष दिले आणि मी शिक्षिका बनली.'

मॅक्लिन म्हणते, 'माझ्या शाळेच्या मुलांना मी खूप मिस करते. प्रोफेशनल खेळाडू बनल्यानंतरसुद्धा मी मुलांशी संपर्कात असते. मी कुठे सरावाला गेले किंवा कुठेही खेळण्यास गेले तर मुलांना अपडेट करते. त्यांना फोनसुद्धा करते. पुढचा वर्ल्डकप २०१७ मध्ये आहे. या स्पर्धेत मी खेळेन की नाही, हे आता माहीत नाही. कारण वयाच्या ३१ व्या वर्षी माझा फिटनेस कसा असेल, हे सांगता येणार नाही. यामुळे अभ्यासावरही माझे लक्ष असते. शक्य आहे की, पुन्हा एक वर्षाने मी शिकवताना दिसू शकते.'
बातम्या आणखी आहेत...