आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रायफल शूटिंग संघटनेची क्रमवारी जाहीर; तेजस्विनी टॉप-१० मध्ये दाखल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- भारताची आघाडीची आंतरराष्ट्रीय नेमबाज तेजस्विनी मुळेने देशातील अव्वल ९ नेमबाजांमध्ये स्थान मिळवले. १० क्रीडा प्रकारांत प्रत्येकी ९ नेमबाजांची निवड झाली आहे.
राष्ट्रीय रायफल शूटिंग संघटनेने खेळाडूंची नुकतीच क्रमवारी जाहीर केली, त्यात तेजस्विनीचा समावेश आहे. या आघाडीच्या नेमबाजांना २०१६ मध्ये रिओ दि जानेरिओ येथे होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेचा कोटा मिळवण्यासाठी जागतिक वर्ल्डकप आणि वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत खेळण्याची संधी मिळेल. यासाठी या खेळाडूंना देशांतर्गत एकूण ६ निवड चाचणी स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करावी लागेल.

तेजस्विनीने स्पोर्ट रायफल थ्री पोझिशन या नेमबाजी प्रकारात स्थान मिळवले. शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेत्या तेजस्विनीने आतापर्यंत १८ आंतरराष्ट्रीय स्पर्धेत १२ पदके आणि राष्ट्रीय स्पर्धेत ९२ पदकांवर नेम साधला. तिच्या निवडीबद्दल साईचे सहसंचालक वीरेंद्र भांडारकर, तरंग जैन, एम.पी. शर्मा, पोलिस अायुक्त अमितेश कुमार, मनीष धूत यांनी अभिनंदन केले.
बातम्या आणखी आहेत...