आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तेजस्विनी मुळेची जागतिक नेमबाजी स्पर्धेसाठी निवड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - सेंट माद्रिद, फ्रान्स येथे ९ ते १३ ऑक्टोबरदरम्यान होणाऱ्या जागतिक रेल्वे आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेसाठी भारताची आघाडीची नेमबाज तेजस्विनी मुळेची भारतीय संघात निवड झाली आहे. स्पोर्ट रायफल थ्री पोझिशन आणि प्रोन या प्रकारात ती देशाचे प्रतिनिधित्व करेल. रेल्वेच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत ती प्रथमच सहभागी होत आहे. जयपूर येथे झालेल्या रेल्वे संघ निवड चाचणी स्पर्धेत ६०० पैकी ५८१ गुणांची कमाई करत राष्ट्रीय संघात स्थान मिळवले. तिच्यासोबत विश्वजित शिंदे आणि स्वप्निल कुसाळे वैयक्तिक आणि सांघिक गटात स्पर्धेत सहभागी होतील. तिने यापूर्वी १८ आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभाग नोंदवला असून १२ पदके पटकावली आहेत. तिच्या निवडीबद्दल पोलिस आयुक्त अमितेश कुमार, व्हेरॉकचे तरंग जैन, सतीश मांडे आदींनी अभिनंदन केले.
बातम्या आणखी आहेत...